सध्या बाजारात बजाज चेतकची चलती आहे. ओलाच्या स्कूटरमधील आगीच्या घटना, समस्यांमुळे या स्कूटरची मागणी कमी झाली आहे. याचा फायदा आधीपासूनच पेट्रोल दुचाकी बाजारपेठेत असलेल्या टीव्हीएस आणि बजाज या कंपन्यांना होऊ लागला आहे. परंतू, आता या कंपन्यांच्या स्कूटरबाबतही अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत.
बजाज चेतकच्या अनेक ग्राहकांना समस्या येत आहेत. या कंपनीच्या सर्व्हिस सेंटरवरही अनेक गाड्या नादुरुस्त आहेत. अनेक आठवडे, महिने या स्कूटर धूळ खात पडून आहेत. पुण्यासारख्या बजाज कंपनी असलेल्या शहरात सर्व्हिसिंगला दोन दोन महिने वेटिंग मिळत आहे. अशातच आता जिथे बजाज चेतक बनते त्या छत्रपती संभाजीनगर शहरात बजाज चेतकला आग लागल्याची घटना समोर आली आहे.
याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बजाज कंपनीने स्कूटरच्या बॅटरी किंवा मोटरमुळे आग लागलेली नाही, फक्त धूर निघाला असल्याचे म्हटले आहे. बजाज चेतकला आग लागण्याची ही पहिली घटना नाही. २०२३ मध्येही अशीच घटना घडली होती. त्यावेळी ग्राहकाच्या लक्षात आल्याने स्कूटर जळता जळता वाचली होती. आताही तोच प्रकार घडला आहे.
व्हिडीओनुसार चेतक स्कूटर रस्त्याकडेला पडलेली आहे. स्कूटरमधून वेगाने पांढरा धूर बाहेर पडत आहे. अग्निशमन दलाचे जवानांनी तिथे पोहोचून स्कूटरची आग विझविली आहे. अग्निशमन दल पोहोचले नसते तर कदाचित स्कूटरने ओला स्कूटर सारखा पेट घेतला असता. परंतू, मदत वेळेवरच पोहोचल्याने पुढील घटना टळली आहे.
बजाज कंपनीने या स्कूटरला लागलेल्या आगीबाबत खुलासा केला आहे. प्राथमिक तपासणीत धुराचा स्रोत एक प्लास्टिक भाग होता. यामुळे आग किंवा थर्मल रनवेची शक्यता नाही. बॅटरी पॅकमध्ये वापरण्यात आलेले मटेरिअल उच्च प्रतीचे आहे. तसेच अशा घटनांमध्ये वाहनाला सुरक्षित ठेवण्यात सक्षम आहे. आम्ही या घटनेच्या मूळ कारणाचा शोध घेत आहोत. कोणत्याही संभाव्य मुद्द्यांना समजून त्यावर उपाययोजना करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
2023 मध्ये झालेली पहिली घटना...