तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर बजाजची चेतक लाँच; सध्या केवळ दोन शहरांतच मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 06:43 PM2020-01-14T18:43:58+5:302020-01-14T18:45:49+5:30
नवी दिल्ली : बजाज ऑटोने पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. महत्वाचे म्हणजे ही जुनी चेतक नव्या रुपात आली ...
नवी दिल्ली : बजाज ऑटोने पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. महत्वाचे म्हणजे ही जुनी चेतक नव्या रुपात आली आहे. सुरुवातीला ही स्कूटर केवळ पुणे आणि बेंगळुरूमध्येच मिळणार आहे.
बजाजच्या चेतक स्कूटरने साधारण 20 वर्षांपूर्वी भारतीयांच्या मनात गारुड केले होते. एका बाजुला असलेले इंजिन, खाली करून पेट्रोल त्या इंजिनात उतरले की कीक स्टार्ट मारायाची स्टाईल आणि तिच्यावरून नेण्यात येणारे साहित्य आदीसाठी ही चेतक प्रसिद्ध होती. बजाजने हीच थीम पुन्हा नव्या रुपात आणली आहे.
Bajaj Auto ने या चेतकचे बुकिंग सुरू केले आहे. भारतात या स्कूटरचे 6 व्हेरिअंट विकले जाणार आहेत. यामध्ये दोन लूकही आहेत. एक म्हणजे अर्बन आणि दुसरा प्रिमिअम. ही स्कूटर एका चार्जिंगमध्ये 95 किमी धावणार आहे. कंपनीने या स्कूटरवर तीन वर्षे किंवा 50 हजार किमीची वॉरंटी दिली आहे.
भन्नाट...गर्दीत लोकांशी कार बोलणार; हॅक करून दाखवेल त्याला 7 कोटी मिळणार
मस्तच...जमिनीवरच नाही तर, पाण्यावरही सुस्साट धावणारी सायकल आली
तोट्यातली बीएसएनएल नव्या व्यवसायात; महाराष्ट्रातून नशीब आजमावणार
या स्कूटरमध्ये दोन ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत. सिटी आणि स्पोर्ट. फुल डिजिटल कन्सोल देण्यात आला आहे. हा कन्सोल स्मार्टफोनलाही कनेक्ट करता येणार आहे. फुल चार्ज होण्यासाठी पाच तासांचा कालावधी लागणार आहे. तर एका तासात 25 टक्के चार्ज होणार आहे.
महत्वाचे म्हणजे या स्कूटरला कीलेस स्टार्ट देण्यात आले आहे. यासाठी तुमच्या खिशातील चावी काही अंतरावर असणे गरजेचे आहे. या स्कूटरची किंमत 1 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.