बजाजनं लॉन्च केली खूपच स्वस्त बाईक, फीचर-मायलेज सर्वच मस्त! जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 12:07 PM2022-12-20T12:07:52+5:302022-12-20T12:08:55+5:30
जर आपण एखादी स्वस्त बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल, तर आता बाजारात आणखी एक नवी बाईक उपलब्ध झाली आहे.
जर आपण एखादी स्वस्त बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल, तर आता बाजारात आणखी एक नवी बाईक उपलब्ध झाली आहे. बजाज ऑटोने अपडेटेड Platina 110 ABS भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. 2023 बजाज प्लॅटिना 110 ABS ची सुरुवातीची किंमत 72,224 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी ठेवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे 110cc सेगमेंटमधील ABS सह असलेली ही पहिली आणि एकमेव मोटरसायकल आहे. कंपनीने ही बाइक 4 कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च केली आहे.
इंजिन आणि गिअरबॉक्स -
या नव्या बजाज प्लॅटिना 110 एबीएसमध्ये 115.45cc, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड, फ्यूअल-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7,000 RPM वर 8.4 bhp पॉवर जनरेट करते. तर 5,000 RPM पर 9.81 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील देण्यात आला आहे. यात LED DRL सह हॅलोजन हेडलॅम्प युनिट, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेन्ट क्लस्टर, 17 इंचाचे व्हील आणि 11 लीटर क्षमतेचा फ्यूअल टँक देण्यात आला आहे.
बजाज प्लॅटिना 110 एबीएसचे फीचर्स -
या बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि समोर डुअल स्प्रिंग-लोडेड शॉक एब्जॉर्बर देण्यात आले आहे. ब्रेकिंगसाठी पुढील बाजूस सिंगल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS)सह डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक देण्यात येते. बाईकमध्ये एक डिजिटल इंस्ट्रूमेन्ट क्लस्टरही आहे. जे खूपसारी माहिती दर्शवते. आपल्याला यात, गिअर पोझिशन, गिअर गायडन्सशिवाय, ABS अलर्ट देखील मिळेल.