बीएमडब्ल्यूच्या कारना लागतेय आग; 10 लाख डिझेल कार माघारी बोलावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 03:33 PM2018-10-23T15:33:10+5:302018-10-23T15:35:11+5:30
फँकफर्ट : जर्मनीची अलिशान कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने तब्बल 10 लाख डिझेल कार माघारी बोलावल्या आहेत. एक्झॉस्ट सिस्टमला आग ...
Next
फँकफर्ट : जर्मनीची अलिशान कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने तब्बल 10 लाख डिझेल कार माघारी बोलावल्या आहेत. एक्झॉस्ट सिस्टमला आग लागत असल्याचे कारण देण्यात आले आहे.
बीएमडब्ल्यूच्या कारमध्ये कुलंट सदोष पार्टमधून लीक होत आहे. एक्झॉस्ट गॅस सर्क्युलर कुलरमधून हे कुलंट लीक होत असल्याने इतर पदार्थांच्या संपर्कात आल्याने आग लागण्याची शक्यता आहे. यामुळे या डिझेल कार माघारी बोलाविण्यात आल्या आहेत, असे कंपनीने जाहीर केले आहे.
BMW recalls over 1 million cars over exhaust system fire risk, reports AFP
— ANI (@ANI) October 23, 2018
यापूर्वी ऑगस्टमध्ये 4.8 लाख कार माघारी बोलाविण्यात आल्या होत्या हा आकडा मिळून एकूण 1.6 दशलक्ष कार माघारी बोलाविण्य़ात आल्या आहेत.