प्रवासी आणि मालवाहू विमान निर्माता कंपनी बोईंगने तिच्या पहिल्या अॅटोमॅटीक फ्लाईंग टॅक्सीची यशस्वी चाचणी घेतली. VTOL असे या टॅक्सीचे नाव असून टेक ऑफ, हवेत उडण्यास आणि लँडिंग करण्यासा ही टॅक्सी सक्षम असल्याचे म्हटले आहे.
जगभरातील स्टार्टअपपासून अनेक कंपन्या फ्लाईंग टॅक्सी आणण्याच्या प्रयत्नात आहेत. याच्या बातम्याही वेळोवेळी येत असतात. मात्र, बोईंगने त्यांना मागे टाकत फ्लाईंग टॅक्सी प्रत्यक्षात आणली आहे.
या हवाई टॅक्सीचा वापर शहरी वापरासाठी केला जाऊ शकतो. जेथे वाहतूक कोंडीमुळे उपनगरांमध्ये जाणे कठीण बनले आहे. तसेच पर्यावरणाचीही हानी होणार नाही. ही हवाई टॅक्सी वापरल्याने अन्य लोकांनाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.
कंपनी या हवाई टॅक्सीला मालवाहू टॅक्सीच्या दृष्टीनेही वापरण्याचा विचार करत आहे. जे 230 किलो वजन पेलू शकणार आहे. मात्र, कंपनीसमोर या टॅक्सीसाठी ग्राहकवर्ग मिळविण्याचे आव्हान आहे. याशिवाय शहरांमध्ये ही टॅक्सी उडविताना अनेक समस्या येणार आहेत. तसेच सरकारी नियमही अडकाठी आणणार आहेत. कारण जरी ही टॅक्सी हेलिकॉप्टरपेक्षा छोटी असली तरीही देशांच्या हवाई खात्याच्या नियमांमध्ये राहूनच उड्डाण आणि उतरवावे लागणार आहे.