दमदार परफार्मन्स देणाऱ्या बाईक्स; जाणून घ्या किंमत आणि खासियत...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:08 PM2022-03-24T12:08:00+5:302022-03-24T12:14:04+5:30

Powerful Bikes : सध्या देशात कमी बजेटमध्ये अनेक दमदार बाईक्स उपलब्ध आहेत, ज्या परफॉर्मन्सच्या दृष्टीने उत्तम आहेत तसेच लूकमध्ये स्टायलिश आहेत.

buy these 4 powerful bikes know latest price and features | दमदार परफार्मन्स देणाऱ्या बाईक्स; जाणून घ्या किंमत आणि खासियत...

दमदार परफार्मन्स देणाऱ्या बाईक्स; जाणून घ्या किंमत आणि खासियत...

googlenewsNext

नवी दिल्ली : जर तुम्हीही कमी किमतीत चांगली बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सध्या देशात कमी बजेटमध्ये अनेक दमदार बाईक्स उपलब्ध आहेत, ज्या परफॉर्मन्सच्या दृष्टीने उत्तम आहेत तसेच लूकमध्ये स्टायलिश आहेत. त्यामुळे हिरो, होंडा आणि बजाजच्या बाइक्सबद्दल आम्ही माहिती देत आहोत. या बाइक्सच्या यादीमध्ये Bajaj Pulsar NS160, TVS Apache RTR 160 पासून  CB Honda 160R आणि TVS Apache RTR 160 4V यांचा समावेश आहे.

TVS Apache RTR 160 4V
TVS Apache RTR 160 4V ABS ची दिल्ली एक्स-शोरूममध्ये सुरुवातीची किंमत 1,17,278 लाख रुपये आहे. नवीन TVS Apache RTR 160 4V मध्ये 159.7cc सिंगल-सिलेंडर, 4-व्हॉल्व्ह, ऑइल-कूल्ड इंजिन आहे,  जे 16.8hp पॉवर आणि 14.8Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच, या बाईकचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने तयार आहे.

CB Honda 160R
CB Honda 160R ची सुरुवातीची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 1.09 लाख रुपये आहे. CB Honda 160R मध्ये पॉवरसाठी 162.71 सीसी, एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, SI BS-4 इंजिन आहे, जे 8500 आरपीएमवर 14.9 bhp ची कमाल पॉवर आणि 6500 आरपीएमवर 14.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या बाईकचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

Bajaj Pulsar NS160
Bajaj Pulsar NS160 ची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 1 लाख 10 हजार रुपये आहे. Bajaj Pulsar NS160 मध्ये पॉवरसाठी 160.3 सीसी, ऑइल-कूल्ड, 4-स्ट्रोक, SOHC, 4-व्हॉल्व्ह DTS-i इंजिन दिले आहे. जे 8500 आरपीएमवर 15.5PS ची कमाल पॉवर आणि 6500 आरपीएमवर 14.6Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

TVS Apache RTR 160
TVS Apache RTR 160 ची सुरुवातीची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 1,09,640 रुपये आहे. TVS Apache RTR 160 मध्ये 159.7cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 8500 आरपीएमवर 15.8hp पॉवर आणि 6000 आरपीएमवर 13Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

Web Title: buy these 4 powerful bikes know latest price and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.