ठाणे: वारंवार आवाहन करुनही विनाकारण वाहने घेऊन फिरणार्या 826 वाहन चालकावर ठाणे ग्रामीण पोलिसांनी सोमवारी मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख सहा हजारांचा दंडही वसूल केला आहे.
अत्यावश्यक सेवेसाठी दिलेली वाहने वगळता विनाकारण रस्त्यावर फिरताना या चालकावर ही कारवाई करण्यात आली. तर संचारबंदीचे उलंघन केल्याप्रकरणी 46 आरोपीविरुद्ध 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील 38 वाहने जप्त करण्यात आल्याची महिती सूत्रानी दिली. तरी सर्व नागरिकांनी पोलीस आणि प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण घराबाहेर पडू नये, संचारबंदीचे पालन करावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.