शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

झारखंडच्या इंजिनिअरने कमाल केली; हॉयड्रॉलिकवर पळणारी सायकल बनविली, वेग 82 किमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 1:20 PM

Petrol Diesel Price Hike, techie developed Fuel-Less Hydraulic Bike: हजारीबाग जिल्ह्यातील संतोष कुमार गुप्ता याने हे यश मिळविले आहे. ही हायब्रिड सायकल तब्बल 82 किमी प्रति तासाच्या वेगाने पळते. या सायकलला पळण्यासाठी नाही कोणत्या प्रदूषणकारी इंधनाची गरज भासणार नाही सारखे चार्ज करण्यासाठी विजेची गरज भासणार. 

एकीकडे पेट्रोल, डिझेलच्या दरांनी आकाश गाठलेले (Petrol Diesel Price Hike) असताना तसेच पर्याय म्हणून बाजारात असलेल्या ईलेक्ट्रीक स्कूटर महागड्या ठरत असताना झारखंडच्या इंजिनिअरने कमालीचा शोध लावला आहे. त्याने हॉयड्रॉलिक प्रणालीवर धावणारी सायकल बनविली असून तिचा पेटंटही रजिस्टर केला आहे. (A Jharkhand techie has designed and patented a two-wheeler that runs on a Hydraulic system and can go as high as 82 kmph.)

हजारीबाग जिल्ह्यातील संतोष कुमार गुप्ता याने हे यश मिळविले आहे. ही हायब्रिड सायकल तब्बल 82 किमी प्रति तासाच्या वेगाने पळते. या सायकलला पळण्यासाठी नाही कोणत्या प्रदूषणकारी इंधनाची गरज भासणार नाही सारखे चार्ज करण्यासाठी विजेची गरज भासणार. या हायड्रॉलिक सिस्टीमवर जेसीबी सारख्या मशीन काम करतात. त्यांना जी डोंगर पोखरण्याची ताकद मिळते ती हायड्रॉलिक पाईपमध्ये असलेल्या ऑईलमधून जाते. तसाच काहीसा प्रकार यामध्ये वापरण्य़ात आला आहे. पायंडल मारल्य़ावर जी शक्ती तयार होते ती हायड्रोलिक सिलिंडरमधून ऑईलच्या माध्यमातून मागच्या चाकाला मिळणार आहे. म्हणजेच एका ठिकाणी ताकद लावली की ती दुसऱ्या ठिकाणी पोहोच केली जाणार आहे. 

या सिस्टिममुळे सायकलला सारखे सारखे पायंडल मारावे लागणार नाहीत. गुप्ता याने साध्या सायकलची चेन हायड्रॉलिक कॉईलने बदलली आहे. तसेच या सायकलला तीन गिअर आहेत. जास्त पायंडल न मारता सायकल 82 किमी प्रती तासाचा वेग पकडू शकणार आहे, असे गुप्ता याने सांगितले. इंधन खर्च आणि पर्यावरण वाचविणाऱ्यांसाठी ही सायकल एक चांगला पर्याय ठरणार आहे. ही सायकल 35000 रुपयांत उपलब्ध होऊ शकेल असे गुप्ता यांने सांगितले. 

2011 मध्ये पदवीधर...संतोष गुप्ता याने 2011 मध्ये पदवी संपादन केली आहे. तेव्हापासून त्याने नोकरी शोधण्याऐवजी हा सायकल बनविण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला होता. तो शाळेत असल्यापासून बिना इंजिनची आणि इंधनाची बाईक बनविण्याचे स्वप्न पाहत होता. आता त्याचे हे स्पप्न पूर्ण झाले आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलFuel Hikeइंधन दरवाढ