TATA च्या 'या' छोट्या SUV ची जबरदस्त विक्री; उत्तम फीचर्ससह येणाऱ्या कारच्या विक्रीत १३८ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 10:11 PM2021-08-19T22:11:47+5:302021-08-19T22:12:47+5:30

TATA SUV Car : सध्या SUV सेगमेंटमध्ये कॉम्पॅक्ट एसयुव्हींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

Great sales of TATA's 'Ya' small SUV; 138 per cent increase in car sales with better features | TATA च्या 'या' छोट्या SUV ची जबरदस्त विक्री; उत्तम फीचर्ससह येणाऱ्या कारच्या विक्रीत १३८ टक्क्यांची वाढ

TATA च्या 'या' छोट्या SUV ची जबरदस्त विक्री; उत्तम फीचर्ससह येणाऱ्या कारच्या विक्रीत १३८ टक्क्यांची वाढ

Next
ठळक मुद्देसध्या SUV सेगमेंटमध्ये कॉम्पॅक्ट एसयुव्हींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

सध्या देशात कॉम्पॅक्ट एसयुव्हीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लोकांचा कार खरेदी करतानाचा दृष्टीकोनही बदलला आहे. लोकं आता अॅडव्हान्स्ड फीचर्ससह लूक आणि सेफ्टीकडेही पाहत आहेत. या प्रकरणी TATA Motors ची एसयुव्ही Tata Nexon ला मोठी पसंती मिळताना दिसत आहे.

ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या एसयुव्हीला 5 स्टार रेटिंग मिळालं आहे. सेफ्टी, टेक्नॉलॉजी आणि उत्तम परफॉर्मन्समुळे लोकं या कारक़डे वळताना दिसत आहेत. या एसयुव्हीनं Hyundai Venue आणि Kia Sonet सारख्या कार्सच्या विक्रीलाही मागे टाकलं आहे. विक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास टाटा मोटर्सनं जुलै महिन्यात या एसयुव्हीच्या एकूण 10,287 युनिट्सची विक्री केली आहे. ही गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यातील 4,327 युनिट्सच्या तुलनेत 138 टक्के अधिक आहे. पहिल्यांदाच टाटा मोटर्सनं एका महिन्यात 10 हजारांपेक्षा अधिक Nexon मॉडेल्सची विक्री केली आहे.

Tata Nexon बाजारात एकूण दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. यात 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे देण्यात आलं आहे जे 120PS ची पॉवर आणि 170 Nm चा टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे, त्याच्या डिझेल व्हेरिअंटमध्ये कंपनीने 1.5-लीटर टर्बो डिझेल इंजिन वापरलं आहे, जे 110 PS ची पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतं. पेट्रोल आणि डिझेल सोबत ही कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. 

अनेक उत्तम फीचर्स
या कारमध्ये कंपनीने अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत जे इतर मॉडेल्सपेक्षा या कारला चांगलं बनवतात. यात 7 इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे, जी अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोला कनेक्ट येते. या व्यतिरिक्त, डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टी फंक्शनल स्टियरिंग व्हील, हाईट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, पॉवर अॅडजस्टेबल आउट साइड रिअर व्ह्यू मिरर (ओआरव्हीएम), कॉर्नरिंग फॉग लॅम्प, इलेक्ट्रिक सनरूफ असे अनेक फीचर्स यात देण्यात आले आहेत.

किती आहे किंमत?
ही एसयूव्ही सुरक्षेच्या दृष्टीने देखील खूप खास आहे. यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, रियर पार्किंग सेन्सर्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (ईबीडी) तसेच ISOFIX चाइल्ड सीट अँकरसारखे स्टँडर्ड फीचर्स देण्यात आले आहेत. या एसयुव्हीच्या पेट्रोल व्हेरिअंटची किंमत 7.28 लाख रूपयांपासून 11.89 लाख रूपयांच्या दरम्यान आहे. तर डिझेल व्हेरिअंटची किंमत 9.48 लाख रूपयांपासून 13.23 लाख रूपयांपर्यंत आहे. सध्या कंपनीनं या एसयुव्हीच्या डार्क एडिशन्सदेखील लाँच केल्या आहेत.

Web Title: Great sales of TATA's 'Ya' small SUV; 138 per cent increase in car sales with better features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.