‘वापरासाठी सुरक्षित’ असा शिक्का असलेल्या प्रमाणित हेल्मेटचाच वापर दुचाकीस्वारांना येत्या १ जूनपासून करावा लागणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला बसून कचकड्याच्या, हलक्या दर्जाच्या हेल्मेट्सची विक्री करणाऱ्यांना त्यांचे चंबूगबाळे आवरावे लागणार आहे. भारतीय मानांकन विभाग अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्स (बीआयएस) यांनी प्रमाणित केलेल्या हेल्मेट्सचाच वापर दुचाकीस्वारांना करावा लागेल, असे आदेश केंद्र सरकारने जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रमाणित हेल्मेटसक्तीचा घेतलेला हा आढावा.. आयएसआय हा लोगो भारतीय मानांकल विभागाने प्रमाणित केलेला आहे. असा लोगो हेल्मेटवर असावा हे बंधनकारक असेल.बाह्यआवरण- थर्मोप्लास्टिक आणि फायबर ग्लास यांच्या मिश्रणाने तयार केले जातेफेस शील्ड- फेस शील्डमुळे हवा, धूळ अडवली जाऊन डोळ्यांचे रक्षण होतेस्ट्रॅपिंग सिस्टीम- यामुळे जबडा आणि चेहऱ्याचे रक्षण होतेप्रोटेक्टिव्ह पॅडिंग- पॉलियुराथेन फोमच्या मोल्डिंगने तयार केले जातेपूर्णाकृती हेल्मेटमुळे कपाळ आणि जबड्याचे रक्षण होतेहे बाह्यआवरण आघात सहन करून डोक्याचा बचाव करतेहेल्मेट व्यवस्थित बसते की नाही हे तपासण्यासाठी चिनस्ट्रॅप घट्ट लावून ओढाकाय सांगतो मोटार वाहन कायदा?मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम १२९ अन्वये दुचाकी चालवत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने भारतीय मानांकन विभागाने प्रमाणित केलेल्या शिरस्त्राणाचा वापर करणे गरजेचे आहे. पगडी घातलेल्या शीखधर्मियांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.१,७०,००,०००दुचाकी वाहनांची निर्मिती दरवर्षी भारतात केली जाते
तुम्ही वापरत असलेलं हेल्मेट कणखर आहे का? ते कसं ओळखाल?; जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 4:13 AM