हिरो मोटोकॉर्प ही भारतीय दुचाकी निर्माता कंपनी नवीन 125 सीसी स्कूटर आज लाँच करणार आहे. डेस्टिनी असे या स्कूटरचे नाव असून ती होंडाच्या ग्रॅझिया, टीव्हीएसच्या एनटॉर्क आणि सुझुकीच्या बर्गमॅन स्ट्रीटशी स्पर्धा करणार आहे.
हिरोने या स्कूटरला आधी 2018च्या फेब्रुवारीमधील ऑटो एक्स्पोमध्ये दाखविले होते. मात्र या स्कूटरचे नाव ड्युएट 125 ठेवण्यात आले होते. आता लाँचिंगवेळी या स्कूटरचे नाव बदलण्यात आले असून डेस्टिनी असे ठेवण्यात आले आहे.
हिरोच्या 125 सीसी स्कूटरची किंमत 52 ते 55 हजाराच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ही स्कूटर स्टील व्हील आणि अलॉय व्हील्समध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
या नव्या स्कूटरमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक, इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टिम (आयबीएस), साईड स्टँड इंडिकेटर, सर्व्हिस रिमांइंडर, पास स्वीच आणि अन्य फिचर्स असणार आहेत. ही स्कूटर पूर्णत: कंपनीने स्वत: डिझाईन आणि डेव्हलप केली आहे.