जगातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी Hero MotoCorp (हीरो मोटोकॉर्प) ने पुढील वर्षीच्या मार्च 2022 पर्यंत ईलेक्ट्रीक वाहन लाँच करण्याची घोषणा केली होती. आता ही इलेक्ट्रीक वाहने कोणत्या नावाने किंवा ब्रँडद्वारे लाँच केली जातील याची महत्वाची माहिती समोर आली आहे.
सरकारची अधिकृत ट्रेडमार्क रजिस्ट्रीवर हिरो मोटोकॉर्पने Vida (विडा) नावाने एकापेक्षा अधिक ट्रेडमार्क दाखल केले आहेत. यामध्ये Vida Electric (विडा इलेक्ट्रीक), Vida Mobility (विडा मोबिलिटी), Vida EV (विडा ईवी), Vida MotoCorp (विडा मोटोकॉर्प), Vida Scooters (विडा स्कूटर) आणि Vida Motorcycles (विडा मोटरसायकल) अशी नावे आहेत.
कंपनीच्या आगामी इलेक्ट्रिक दुचाकी विडा ब्रँड अंतर्गत येऊ शकतात. Hero MotoCorp आणि Hero Electric यांच्यातील सामंजस्यानुसार, Hero MotoCorp 'हीरो' नावाने कोणतेही इलेक्ट्रिक वाहन विकू शकत नाही. काही महिन्यांपूर्वी, Hero MotoCorp ने तैवान-आधारित ब्रँड गोगोरोसोबत बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानासाठी करार केला होता. त्यामुळे, कंपनीच्या भविष्यातील ईव्ही काढता येणाऱ्या बॅटरीसह येऊ शकतात.
याआधी ऑगस्टमध्ये, पवन मुंजाल यांनी आगामी Hero MotoCorp इलेक्ट्रिक स्कूटरची झलक दाखविली होती. ही ब्रँडची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर असू शकते. हे मॉडेल भारतातील Ola S1 Pro, Ather 450X, बजाज चेतक (Bajaj Chetak) आणि TVS iQube यासारख्या काही प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरना आव्हान देऊ शकते.
कंपनीने दाखल केलेल्या ट्रेडमार्कनुसार, असे दिसते की Hero MotoCorp देखील एक इलेक्ट्रिक बाइक विकसित करत आहे. जी ब्रँडची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आल्यानंतर काही महिन्यांनंतर लॉन्च केली जाऊ शकते. असे झाल्यास, आगामी Hero MotoCorp इलेक्ट्रिक बाइक सेगमेंटमध्ये Revolt RV400 (Revolt RV400) शी स्पर्धा करेल.