हिरोची डेस्टिनी आली; 125 सीसीच्या सेगमेंटमध्ये धूम माजविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 02:17 PM2018-10-22T14:17:08+5:302018-10-22T14:17:32+5:30
नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्पने आपल्या नव्या कोऱ्या डेस्टिनी या 125 सीसी स्कूटरचे लाँचिंग केले. या स्कूटरची सुरुवातीची किंमत ...
नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्पने आपल्या नव्या कोऱ्या डेस्टिनी या 125 सीसी स्कूटरचे लाँचिंग केले. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 54,650 रुपये एक्स शोरुम दिल्ली ठेवण्यात आली असून दिवाळीपूर्वी ती विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
i3S (स्कूटर कोणतीही हालचाल न करता थांबलेली असल्या आपोआप बंद-सुरु होण्याची प्रणाली) ही अत्याधुनिक प्रणाली असलेली भारतातील पहिली स्कूटर आहे. भारतात 125 सीसी इंजिन क्षमता असलेल्या स्कूटरचे मार्केट वाढत आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांनी त्यांच्या 125 सीसीच्या स्कूटर लाँच केल्या आहेत. यामुळे हिरो मोटोकॉर्पनेही ही पोकळी भरून काढण्यासाठी डेस्टीनी ही स्कूटर लाँच केली आहे. दिल्ली आणि एनसीआर भागात उद्यापासून ही स्कूटर उपलब्ध होणार आहे. तर उर्वरित देशात काही आठवड्यांत ही स्कूटर दाखल होईल.
या स्कूटरची सुरुवातीची किंमत Lx व्हेरिअंटसाठी 54,650 रुपये तर Vx व्हेरिअंटसाठी 57500 रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे.
या स्कूटरमध्ये i3S प्रणालीसोबतच डिजिटल अॅनालॉग स्पीडोमीटर, साईड स्टँड इंडिकेटर, सर्व्हिस ड्यू रिमाइंडर अशा स्मार्ट सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच मेटॅलिक रंगामध्ये नोबल रेड, चेस्टनट ब्रॉन्झ, पँथर ब्लॅक आणि पर्ल सिल्व्हर व्हाईट अशा रंगात ही डेस्टिनी स्कूटर उपलब्ध आहे.