स्वस्तात कार खरेदीची शानदार संधी, Honda Cars वर मिळतोय बंपर डिस्काउंट!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 06:57 PM2021-12-04T18:57:03+5:302021-12-04T18:57:50+5:30
Honda cars Price : अनेक होंडा कारवर तुम्ही 45000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. या डिस्काउंटमध्ये रोख सवलतीपासून ते अॅक्सेसरीज ऑफरपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.
Honda cars Price : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी होंडा कार्स इंडियाने (Honda Cars India) काही निवडक मॉडेल्सवर डिस्काउंट ऑफर दिली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीत कार खरेदी करू शकता.
अनेक होंडा कारवर तुम्ही 45000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. या डिस्काउंटमध्ये रोख सवलतीपासून ते अॅक्सेसरीज ऑफरपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. तसेच, होंडाने ज्या गाड्यांवर सूट दिली आहे, त्यात Jazz, WR-V, City, 4th जनरेशन सिटी आणि Amaze यांचा समावेश आहे. या सर्व ऑफर केवळ 31 डिसेंबरपर्यंत आहेत.
न्यू होंडा जॅझ (Honda Jazz Price)
होंडा कंपनीच्या नवीन न्यू होंडा जॅझ (Honda Jazz) वर 35147 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये तुम्हाला 10000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट किंवा 12147 रुपयांपर्यंतच्या अॅक्सेसरीज मिळू शकतात. याशिवाय, तुम्ही 5000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट देखील घेऊ शकता. कंपनी आपल्या ग्राहकांना 5000 रुपयांची होंडा ग्राहक लॉयल्टी बोनस देत आहे. होंडा कार एक्सचेंज तुम्ही नवीन कारच्या खरेदीवर 4000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट सुद्धा घेऊ शकता.
होंडा डब्ल्यूआर-व्ही (Honda WR-V Price)
होंडा डब्ल्यूआर-व्हीवर 28000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळत आहे. या डिस्काउंटमध्ये 9000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, 4000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट, 5000 रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस आणि 10000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देण्यात आला आहे. होंडा डब्ल्यूआर-व्हीवर कॅश डिस्काउंट नाही.
न्यू होंडा अमेज (Honda Amaze Price)
तुम्ही होंडा कारच्या सेडान न्यू होंडा अमेजवर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात 15000 रुपयांचा अतिरिक्त लाभ देखील घेऊ शकता. यामध्ये होंडा 5,000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस, 6000 रुपयांचा होंडा कार एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे.
न्यू होंडा सिटी (Honda City Price)
होंडाच्या अतिशय लोकप्रिय सेडान ऑल न्यू होंडा सिटीवर 45,108 रुपयांची ऑफरही दिली जात आहे. होंडा सिटी कार एक्सचेंजवर 30 हजार रुपयांचा लाभ मिळेल. यामध्ये 7500 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट किंवा 8108 रुपयांपर्यंतच्या FOC अॅक्सेसरीज, 15,000 रुपयांपर्यंतच्या कार एक्सचेंजवर डिस्काउंट, 5000 रुपये होंडा ग्राहक लॉयल्टी बोनस, 9000 रुपये होंडा कार एक्सचेंज बोनस आणि 8,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे.
होंडा सेडान – 4th जनरेशन
होंडाच्या सेडान – 4th जनरेशन कारवर 22 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये 5000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस, 9000 रुपये होंडा कार एक्सचेंज बोनस आणि 8000 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंटचा लाभ मिळत आहे.