इलेक्ट्रीक मार्केटमध्ये धमाका करणार Honda कंपनी, एक दोन नव्हे तर ई-स्कूटरची रांगच लागणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 04:20 PM2022-09-14T16:20:15+5:302022-09-14T16:21:36+5:30

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वाढली आहे. प्रत्येक कंपनी स्वतःचे इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करत आहे.

honda to introduce 10 new electric two wheelers by 2025 | इलेक्ट्रीक मार्केटमध्ये धमाका करणार Honda कंपनी, एक दोन नव्हे तर ई-स्कूटरची रांगच लागणार...

इलेक्ट्रीक मार्केटमध्ये धमाका करणार Honda कंपनी, एक दोन नव्हे तर ई-स्कूटरची रांगच लागणार...

googlenewsNext

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वाढली आहे. प्रत्येक कंपनी स्वतःचे इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करत आहे. यात आता होंडानेही आपली पकड मजबूत करण्याची जबरदस्त तयारी केली आहे. होंडा येत्या ३ वर्षात आपल्या इलेक्ट्रिक गाड्या लाँच करणार आहे. होंडा 2025 पर्यंत एक, दोन नव्हे तर १० इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. 

होंडाच्या आगामी इलेक्ट्रिक मॉडेल्समध्ये इलेक्ट्रिक मोपेड, ईव्ही प्रवासी आणि सायकलींचा समावेश असेल. कंपनीने त्यांना FUN EV असं नाव दिलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांसोबतच कंपनी फ्लेक्स इंधन मॉडेल्सवरही काम करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या यादीत होंडा सॉलिड स्टेट बॅटरीवर काम करत आहे.

EV स्कूटर्स 2023 मध्ये लॉन्च होणार 
ऑटोमोबाईल वेबसाइट ऑटो कारनुसार, कंपनी 2023 पर्यंत भारतात आपले पहिले फ्लेक्स इंधन मॉडेल लॉन्च करू शकते. E100 मॉडेल 2025 पर्यंत वगळले जाईल असा दावा केला जात आहे. जपानी कंपनी होंडा फ्यूचर ग्रीन मॉडेलवर अतिशय वेगाने काम करत आहे. यात अनेक मॉडेल्स लॉन्च करण्याच्या तयारीत कंपनी आहे.

Fun EV अंतर्गत लॉन्च केले जाईल
होंडा फन ईव्ही अंतर्गत या स्कूटर्स लाँच करणार आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक मॉडेल्सची दोन भागात विभागणी केली आहे. यापैकी एक Fuv EV सेगमेंट अंतर्गत लॉन्च केला जाईल. फन ईव्ही वाहने 2024 पूर्वी लॉन्च केली जातील. कंपनीला आशा आहे की या नवीन मॉडेल्सच्या माध्यमातून कंपनीच्या विक्रीच्या आकड्याला फायदा होईल. 2025 पर्यंत 10 लाख युनिट्स लॉन्च करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

Web Title: honda to introduce 10 new electric two wheelers by 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.