सीएनजी किती फायदेशीर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 11:53 AM2017-07-24T11:53:18+5:302017-07-25T16:30:10+5:30

शहरात दररोज काचे भरपूर रनिंग होणार आहे, वाहतूककोंडीमध्येही तोंड द्यावे लागणार आहे व त्यामुळे इंधनावर जास्त खर्च करायची चिंता असेल तर सीएनजी वापरा, चार वर्ष वापरल्यानंतर पैसे वसूल कार विकून दुसरी घ्या.

How much CNG is beneficial? | सीएनजी किती फायदेशीर?

सीएनजी किती फायदेशीर?

googlenewsNext

शहरात दररोज काचे भरपूर रनिंग होणार आहे, वाहतूककोंडीमध्येही तोंड द्यावे लागणार आहे व त्यामुळे इंधनावर जास्त खर्च करायची चिंता असेल तर सीएनजी वापरा, चार वर्ष वापरल्यानंतर पैसे वसूल कार विकून दुसरी घ्या... असा साधा सरळ सल्ला अनेकजण देतात. सीएनजी स्वस्त आहे म्हणून कार वापरणारे महाभाग कमी नाहीत पण या स्वस्त सीएनजीचा विचार करता ती कार जास्तीत जास्त वापरली गेली तर उपयोग, अन्यथा सीएनजी कीटसाठी वा सीएनजी कीट कंपनी फिटेड आहे म्हणून अधिक पैसे मोजण्यात काही अर्थ नाही.
सध्या इंधनाचे एकंदर चार प्रकार उपलब्ध आहेत. डिझेल, पेट्रोल, सीएनजी व एलपीजी. याशिवाय इलेक्ट्रिक मोटारही आता उपलब्ध आहेत. मात्र शहरांमध्ये खास करून सध्या सीएनजी या इंधनावर चालणाऱ्या कारवर अधिक भर देण्यात येत आहे. सीएनजी इंधनाची किंमत ही पेट्रोल व डिझेलपेक्षा खूप कमी असल्याने आणि किंमतीच्या तुलनेत मिळणारे मायलेज हे आकर्षक असल्याने सीएनजीवर चालणाऱ्या मोटारींना शहरामध्ये अधिक मागणी आली तर नवल नाही. आता काही कंपन्या तर थेट सीएनजी सुविधा असलेल्या मोटारीही ग्राहकांसमोर सादर करू लागल्य. या आधी ती सुविधा नव्हती तेव्हा कारमध्ये सीएनजी कीट बाहेरून लावून घेतला जात होता. सीएनजी कीट लावल्यानंतर त्याची नोंद आरटीओकडे करावी लागते, त्याची नोंद आरसी बुकवरही येते व तशी सीएनजी कीटची मुदत, तो बसवल्याची तारीख याची नोंद असलेली एक पट्टी कारमध्ये- वाहनामध्ये लावली जाते. सध्या हॅचबॅक, सेदान, एमयूव्ही (MULTI UTILITY VEHICLE) यात प्रामुख्याने सीएनजी यंत्रणेचा वापर होत आहे. असे असूनही मुंबई, पुण्यासारख्या काही निवडक शहरांमध्ये व शहराबाहेर काही अल्प ठिकाणी सीएनजी भरणआ केंद्रे आहेत. किंबहुना सीएनजीसाठी लागणाऱ्या रांगा कमी झालेल्या नाहीत व सीएनजी केंद्रे शहरातही आवश्यक प्रमाणात वाढलेली नाहीत. मुंबईतील बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सीसेवा, टुरिस्ट वाहने आता पूणर्पणे सीएनजीवर आणली गेली आहे. काही मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोंनाही सीएनजी बसवण्यात आलेला आहे.
सीएनजी (COMPRESSED NATURAL GAS) खरोखरच बसवण्याची गरज आहे का, असाही प्रश्न जाणकारांना पडतो. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये आता सीएनजी मिळत असल्याने सीएनजीच्या टाकीच्या क्षमतेची बाब लक्षात घेतली तर या शहरांमध्ये व परिसरात ये-जा करता येते हे देखील फायद्याचे आहे. पण तरीदेखील सीएनजी भरणा केंद्रावरील गर्दी पाहिली की, नको तो सीएनजी आपले पेट्रोल बरे असा सरळ विचार योग्य वाटतो. मुळात विचार करण्यासारखी एक बाब आहे, ती म्हणजे डिझेलसाठी, पेट्रोलसाठी स्वतंत्र बनावटीचे इंजिन आहे मग ते सीएनजीसाठी का बनवले गेले नाही?

Web Title: How much CNG is beneficial?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.