आता जवळपास सर्वांचे इलेक्ट्रीक बाईक, स्कूटर बाबतचे गैरसमज दूर झाले असतील एवढी मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध झाली आहे. कंपन्यच एवढ्या झाल्यात की कोणती घेऊ, कोणती नको असा प्रश्न सर्वांना पडला आहे. स्कूटरमध्ये अनेक पर्याय आहेत परंतू मोटरसायकलमध्ये दोन-तीनच पर्याय आहेत. यापैकी एक तीन वर्षे जुना आणि दुसरा काही दिवस झालेत.
रिव्होल्ट आरव्ही ४०० ला लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही स्कूटर चालविणारे देखील आहेत. त्यांनी धाडस केले म्हणून आज पैसे वाचवू शकले आहेत. तुम्ही ही इलेक्ट्रीक स्कूटर जेवढे पैसे तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी खर्च करता तेवढे पैसे ईएमआय देऊन घरी आणू शकता. चला जाणून घेऊया.
रिव्होल्टची बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला 20000 रुपयांचे डाऊनपेमेंट भरावे लागणार आहे. रिव्होल्ट आरव्हीची किंमत 1,24,999 रुपये ऑनरोड आहे. यामध्ये 3.24 KWh इलेक्ट्रीक मोटर लावलेली आहे. सिंगल चार्जमध्ये ही मोटरसायकल 150 किमीची रेंज देते. प्रत्यक्षात ही मोटरसायकल 110 किमीची रेंज देते. ही स्कूटर चार्ज करण्यासाठी साडे चार तास लागतील.
जर तुम्ही 20000 रुपये डाऊन पेमेंट करून ही स्कूटर विकत घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला कर्जाचा आणि हप्त्यांचा विचार करावा लागणार आहे. तुम्हाला 1,04,999 रुपयांचे कर्ज मिळेल. त्यावर 9 टक्क्यांच्या हिशेबाने तीन वर्षांसाठी कर्ज घेतल्यास दर महिन्य़ाला 3,704 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. तीन वर्षांसाठी 28 हजार रुपये व्याज द्यावे लागेल. पेट्रोलचा विचार केला तर 3,704 रुपयांचे पेट्रोल तुम्हाला दर महिन्याला लागत असेल.