Tata Punchची जादू जबरदस्त; आता Hyundai नवी कार लॉन्च करत देणार टक्कर, असं असेल नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 07:56 PM2022-01-09T19:56:35+5:302022-01-09T19:57:33+5:30
Hyundai ची ही कार केवळ Tata Punch लाच नाही, तर Renault Kiger, Mahindra KUV100 आणि Maruti Suzuki Ignis लाही टक्कर देईल.
टाटा मोटर्सची नवी कार Tata Punchने लोकांना एवढी भुरळ घातली आहे, की यामुळे इतर कंपन्यांमध्येही घबराट निर्माण झाली आहे. यातच आता Hyundai Motors लवकरच पंचला टक्कर देणारी जबरदस्त कार घेऊन येत आहे.
येणार Hyundaiची नवी एसयूव्ही -
Hyundai Motors लवकरच आपली नवी सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही घेऊन येत आहे. ही कार 2023 पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. कंपनीने ही कार भारतात आणण्याचीही प्लॅनिंग केली आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, हीचे कोडनेम Ai3 असे आहे.
कोरियात आली आहे अशी कार -
Hyundai ने काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाच्या बाजारात Hyundai Casper लाँच केले होते. ही कारही एक मायक्रो एसयूव्ही आहे. यात कंपनीने दोन पेट्रोल इंजिनचे पर्याय दिले आहेत. यांपैकी एक 1.0-लिटर मल्टी-पॉइंट इंजेक्शन पेट्रोल इंजिन तर दुसरे 1.0-लिटर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन अनुक्रमे 75hp आणि 99hp मॅक्स पॉवर जेनरेट करतात.
भारतीय बाजारात कंपनी Casper ला 1.2 लीटरच्या 4-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह देखील लॉन्च करू शकते. ही कार Hyundai च्या Grand i10 Nios प्रमाणेच 83hp पॉवर जनरेट करू शकते.
Kiger, Ignis ला देणार टक्कर -
Hyundai Ai3 अथवा Casper मध्ये अनेक अॅडव्हान्स फिचर्स असतील. ही कार केवळ Tata Punch लाच नाही, तर Renault Kiger, Mahindra KUV100 आणि Maruti Suzuki Ignis लाही टक्कर देईल.