शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
2
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
3
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
4
दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांची हॅटट्रिक; शिवसेना उबाठा गटाच्या घोसाळकर यांचा दारूण पराभव 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "बहि‍णींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले"; विजयानंतर अजित पवारांचा टोला
6
नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
7
'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
8
Maharashtra Assembly Election Result 2024: मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महायुतीचा मुख्यमंत्री कोण?; खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
10
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
11
Maharashtra Assembly Election Result 2024: वर्सोव्यात शिवसेना उबाठाच्या हारुन खान यांचा विजय, भाजपच्या भारती लव्हेकरांचा १६०० मतांनी पराभव
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
15
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
16
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
18
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
19
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
20
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?

ह्युंदाईची सँट्रो येत्या वर्षात पुन्हा येणार नव्या स्वरूपात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 6:26 PM

मूळ दक्षिण कोरियाच्या ह्युंदाई या वाहन उत्पादक कंपनीने भारतीय बाजारपेठेत १९९८ मध्ये आपली पहिली कार ह्युंदाई सँट्रो सादर केली. तेव्हापासून आजपर्यंत ह्युंदाईने आपली भारतीय बाजारपेठेतील एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख कायम ठेवली ती आपल्या उत्कृष्ट उत्पादन व सेवेद्वारे.

ठळक मुद्देयेत्या काळात आम्ही आणखी एक वेगळा व अनोखा अनुभव वोकांना देणार आहोत, तो म्हणजे खऱ्या अर्थाने जमिनीवर या संबंधातील योजना साकारणार आहोत. ती म्हणजे लोकांमध्ये कार नेऊन त्यांना त्या कारची अनुभूती घेऊन देणार आहोत. सर्व स्तरातील लोकांना रस्ते सुरक्षिततेविषयी जागरूक करण्यासाठी आम्ही १०० शाळा व १०० निवासी सोसायटींमध्येही जाऊन मुलांना माहिती दिली. येत्या कालामध्येही अशा प्रकारचे उपक्रम आम्ही करीत राहाणार आहोत, असेही पुनित आनंद यांनी सांगितलेवीजेवर चालणारी मोटार हा ही आमच्यादृष्टीने महत्त्वाचा भाग असून आम्ही त्या दिशेने काम करीत आहोत. अमेरिका, युरोप व कोरियामध्ये आयोनिक ही वीजेवर चालणारी मोटार आम्ही सादरही केली आहे.

मुंबई : गेल्या २० वर्षांपासून भारतामध्ये ह्युंदाईची असणारी ग्राहकांमधील लोकप्रियता व विश्वास यामुळे कंपनीने सातत्याने नवनवी उत्पादने म्हणजेच त्यांच्या मोटारी नवीन नवीन तंत्रज्ञानातून ग्राहकांपुढे सादर केल्या. गेल्या या वीस वर्षांच्या अनेक स्मरणीय आठवणी आणि भविष्यातील व चालू काळातील काही योजनांबाबत ह्युंदाई इंडियाचे विपणन महाव्यवस्थापक आणि समूहप्रमुख पुनित आनंद यांच्याशी लोकमत न्यूजने संवाद साधला.

आपल्या सुरुवातीपासूनच्या ह्युंदाईशी संलग्न असलेल्या आठवणी पुनित आनंद सांगू लागले, ह्युंदाईच्या सुरुवातीपासून आपण या कंपनीशी जुळलो गेलो, तो आजपर्यंत. कंपनीने केलेल्या वाटचालीचा, ग्राहकांचा आमच्यावर असलेल्या विश्वासाचा मी साक्षीदार झालो. ह्युंदाई ही भारतातील अशी एकमेव कंपनी आहे की, जिने पांचवेळा इंडियन कार ऑफ द इयर (ICOTY) हा पुरस्कार प्राप्त केला.सर्वात प्रथम आम्हाला हा पुरस्कार मिळाला तो २००८ मध्ये ह्युंदाई आय१० साठी, त्यानंतर २०१४ मध्ये ह्युंदाई ग्रॅण्ड आय१० व २०१५ मध्ये ह्युंदाई इलाइट आय २० व २०१६ मध्ये ह्युंदाई क्रेटासाठी त्यानंतर २०१८ मध्ये ह्युंदाई वेरनासाठी हा ICOTY पुरस्कार मिळाला. या महत्त्वापूर्ण अशा पुरस्कारांमधून ह्युंदाईच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील ठळक वैशिष्ट्ये व आमचे काम याचेच प्रत्यंत्र यावे. यावरून लक्षात येते की ग्राहक आमच्यावर किती विश्वास करतात, पुनित आनंद सांगत होते.

आणखी वाचा - मारुती डिझायरला पछाडत ही कार बनली इंडियन कार ऑफ द इयर

पुनित आनंद म्हणाले की, आमची कंपनी अशी आहे की, जे काही उत्पादन आम्ही तयार करत असतो त्या त्या वेळी आम्ही ग्राहकांच्या गरजांचा सर्वतोपरी विचार करत असतो व त्याचा प्रत्यय ह्युंदाईच्या कारमध्ये ग्राहकांना मिळत असतो. ह्युंदाई वेरना हे आमच्यासाठी एक स्पर्धात्मक व GAME CHANGER उत्पादन आहे. अनेक वेगवेगळी वैशिष्ट्ये या कारमध्ये आम्ही यात समाविष्ट केलेली आहेत. या वर्गवारीमधील अन्य कंपनीच्या कारममध्ये जी ही वैशिष्ट्ये पाहावयास मिळत नाहीत, ती या कारमध्ये आहेत. NEXT GEN VERNA मध्ये व्हेंटिलेटेट अशी आसने, सनरूफ, ऑटोमॅटिक रेअर ट्रंक, आयपीएस पॅनेल अशी काही वैशिष्ट्ये आहेत की, जी मोठ्या किंतीच्या मोटारींमध्ये असतात. याशिवाय अन्य २१ स्वतंत्र अशी वैशिष्ट्ये यामध्ये आम्ही सादर केलेली आहेत. हीच खासियत आहे की, ग्राहक या कारकडे आकर्षित होत आहेत. इंजिन, त्याची कार्यक्षमता, स्टाईल वा खास अशी शैली यामध्येही ही कार अन्य मोटारींपेक्षा अधिक उत्कृष्ट ठरते.

आणखी वाचा - सीएनजीचा वापर करताना त्या कारची परिपूर्ण देखभाल करणे अत्यावश्यक

या मोटारीमध्ये सुरक्षिततेचाही महत्त्वाचा विचार केला आहे. तसेच नवे तंत्रज्ञान हा महत्त्वाचा भाग यामध्ये आहे. HYUNDAI VERNA ची खरी स्पर्धा आहे ती पोंडा सिची व मारूती सुझुकीच्या सियाझशी यासारख्या मोटारींनी बाजारात आपली पकड ठेवलेली आहे. अशा परिस्थितीत NEXT GEN VERNA या प्रकारातील नेतृत्त्वाची मोटार म्हणून सिद्ध करणे किती कठीण आहे, याचा विचार केलेलाच बरा पण. या अशा मोठ्या स्पर्धात्मक स्थितीतही NEXT GEN VERNA ही बाजारात नेतृत्त्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असे सांगताना पुनित आनंद यांनी आणखी एक बाब सांगितली ती म्हणजे बाजारातील सध्याच्या ट्रेंडमधील. सध्या लोकांचा कल हा कॉम्पॅक्ट एसयूव्हीकडे असून अशा मध्ये सी सेगमेंट मधील सेदान मोटारी तशा कमी चांगली कामगिरी करीत असताना वेरनाने मात्र श्रेणीला खऱ्या अर्थाने पुनरुज्जीवीत केले , त्यामुळेच सेदान प्रकारामधील मोटारींबाबतग्राहकांचा विश्वास व आक्रषण पुन्हा वाढले आहे. NEXT GEN VERNA दर महिन्याला ४५०० ते ५००० इतक्या ग्राहकांना आपललेसे करीत आहे, हीच या कारच्या यशस्वीतेची गाथा म्हणावी लागेल.

येत्या फेब्रुवारी २०१८ मध्ये ऑटो एक्स्पोमध्य़े आम्ही आमचे नवे तत्त्वज्ञान, नवी दिशा व नवीन उत्पादन सादर करणार आहोत. अद्ययावत असे तंत्रज्ञान, जागतिक उत्पादने या ऑटो एक्स्पोमध्ये पाहायला मिळणार आहेत. यात वीजेवर चालणाऱ्या मोटारीही आहेत. प्रत्येक कंपनी यात आपले वेगवेगळे उत्पादन, अनुभव सादर करणार आहे. आम्ही यावेळी वीजेवर चालणार्या मोटारींबाबच लोकांना सांगूच. वेगवेगळ्या उपक्रमांनाही आम्ही सादर करणार आहोत. खास मुलांसाठीही आम्ही काही सादर करणार आहोत.ह्युंदाई इंडिया म्हटले की, आजही लोकांना सँट्रो आठवते. अनेकांची पहिली मोटार सँट्रो असल्याचेही दिसून येते. भावनात्मकदृष्टीनेही अनेकजण या संट्रोशी नाते जोडलेले आढळतात. माझीही पहिली मोटार सँट्रोच होती, असे सांगत पुनित आनंद हे ही सँट्रोच्या आठवणीत रमले. सँट्रो मोटार ही TREND SETTER होती. या मोटारीद्वारे MPFI हे तंत्रज्ञान सादर केले गेले. भारतातील पहिली TALL BOY म्हटली जाणारी ही मोटार आमच्या यशामधील एक अतिशय महत्त्वाचा असा हिस्सा आहे.

आणखी वाचा - नववर्षानिमित्त हिरो मोटर्सने लाँच केल्या तीन नव्या बाईक्स

आम्ही आमच्या ग्राहकांना कधी निराश करीत नाही, यामुळेच मी सांगू इच्छितो की, येत्या २०१८ मध्ये आम्ही एक नवी CONTEMPORARY कौटुंबिक मोटार सादर करणार आहोत. ही मोटार EON व GRAND I 10 या मोटारींच्या मधल्या वर्गातील असेल. याचे नाव काय द्यावे यावर विचार चालू आहे. अजून ते नाव काय ठेवायचे ते निश्चित झालेले नाही. या नव्या कारचे नाव सँट्रो ठेवायचे की नाही, ते नक्की झालेले नाही. मात्र एक स्पष्ट सांगतो की सँट्रो सारखीच ही परिपूर्ण अशी कौटुंबिक कार असणार आहे.चार मीटर लांबी दरम्यानच्या कारबाबत सांगताना ते म्हणाले की, आम्ही ग्राहकांच्या या मागणीला आधीच विचारात घेतलेले आहे. २०१६ मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या ऑटोएक्स्पोमध्ये HYUNDAI CARLINA हे कन्सेप्ट मॉडेल आम्ही सादर केले होते. २०१९ मध्ये पहिल्या काही महिन्यांमध्ये आम्ही भारतीय बाजारपेठेत सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही सादर करणार असून त्याच्या नावाबाबतही विचार चालू आहे. २०२० पर्यंत ह्युंदाई भारतात ८ नव्या मोटारी सादर करणार असल्याचे आम्ही आधीच घोषित केले आहे. त्या अंतर्गत आम्ही ELANTRA, TUCSON, VERNA सादर केल्या आहेतच.

ऑटोसंदर्भात बातम्यांंसाठी येथे क्लिक करा.

येत्या वीस वर्षांमध्ये आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया, स्कील इंडिया व डिजिटल इंडिया या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.एकूणच लोकांना एक नक्की सांगावेसे वाटते की एकदा तरी ह्युंदाईची अनुभूती नक्कीच घ्यावी, आम्ही निराश करणार नाही कारण जागतिक दर्जाची आधुनिक कार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही पुनित आनंद यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Auto Expo 2018ऑटो एक्स्पो २०१८MumbaiमुंबईHyundaiह्युंदाईAutomobileवाहन