रोल्स रॉयस घेणे म्हणजे करोडो भारतीयांसाठी दिवास्वप्नच आहे. तरीही अनेकजण महागड्या कार घेण्याचे स्वप्न पाहतात. अनेकांकडे काळा पैसाही असतो, परंतू ते ही कार घेऊ शकत नाहीत, कारण दिसण्यास येते आणि परत इन्कम टॅक्स, ईडी मागे लागण्याची भीती असते. परंतू, एक कुतुहल म्हणून Rolls-Royce ची किंमत आणि कर्जावर घ्यायची तर त्याचा ईएमआय जाणून घेण्यात काय हरकत आहे.... नाही का...
रोल्स रॉयस ही जगातील सर्वात महागड्या कारमध्ये मोडते. ही कार मुकेश अंबानी, शाहरुख खान यांच्यासह अनेक उद्योगपती, राजघराण्यांकडे आहे. या कारसाठी किती डाऊनपेमेंट करावे लागले ईएमआय किती असेल याविषयी जाणून घेऊया.
रोल्स रॉयस भारतीय बाजारात चार प्रकारच्या कार विकते. यामध्ये Rolls-Royce Cullinan, Ghost, Phantom आणि Spectre यांचा समावेश आहे. रोल्स रॉयस फँटमची ऑन रोड किंमत आणि ईएमआय, डाऊनपेमेंट किती ते आता समजणार आहे.
Rolls-Royce Phantom ची एक्सशोरुम दिल्लीची किंमत ८.९९ कोटी रुपयांपासून सुरु होते. याचही टॉप मॉडेल आहेत. याची किंमत १०.४८ कोटींपर्यंत जाते. ८.९९ कोटींची कार घ्यायची तर त्याची ऑन रोड किंमत १०.३२ कोटींवर जाते.
रोल्स-रॉयस फँटमसाठी कर्ज घ्यायचे तर २ कोटी रुपयांचे डाऊन पेमेंट करावे लागते. ७ वर्षासाठी घेतले तर ९.८ टक्के व्याजदर आकारला जातो. यानुसार ८.३२ कोटींचे कर्ज मिळते. सात वर्षांसाठी दर महिन्याला १३.७४ लाख रुपयांचा ईएमआय भरावा लागतो. या कर्जावर तुम्हाला ३.२१ कोटी रुपयांचे निव्वळ व्याजच द्यावे लागणार आहे. म्हणजेच ही कार तुम्हाला जवळपास १४ कोटी रुपयांना पडणार आहे.