या भारतीय कंपनीची हायब्रिड स्कूटर येणार....70 चे मायलेज देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 03:53 PM2018-08-13T15:53:15+5:302018-08-13T15:56:56+5:30

23 ऑगस्टला ही दुचाकी लाँच होण्याची शक्यता

Indian company TVS iQube Hybrid scooter will come ... | या भारतीय कंपनीची हायब्रिड स्कूटर येणार....70 चे मायलेज देणार

या भारतीय कंपनीची हायब्रिड स्कूटर येणार....70 चे मायलेज देणार

Next

नवी दिल्ली : मोपेड दुचाकींमध्ये भारतीय बाजारात आपली मोहोर उमटविणारी देशी कंपनी टीव्हीएस लवकरच देशातील पहिली हायब्रिड मोपेड आणणार आहे. येत्या 23 ऑगस्टला ही दुचाकी लाँच होण्याची शक्यता आहे.

 
टीव्हीएस स्कुटी, पेपनंतर ज्युपिटर या स्कूटरनी भारतीय ग्राहकाना भुरळ घातली आहे. यानंतर काळाची पाऊले ओळखून कंपनीने TVS iQube Hybrid ही स्कूटर बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्कूटर टीव्हीएसने प्रथम 2014 च्या ऑटो एक्स्पोमध्ये समोर आणली होती. आता चार वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ही स्कूटर बाजारात अवतरणार आहे. 


या दुचाकीमध्ये नवे आयसीई म्हणजेच इंटरनल कंबशन इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचा एकत्रित वापर केला जाणार आहे. आयक्यूब हायब्रीड या ट्रेडमार्कचीही कंपनीने नोंदणी केल्याचे वृत्त आहे. TVS iQube Hybrid मध्ये 110 सीसीचे सिंगल सिलिंडर पेट्रोल इंजिन वापरण्यात येणार आहे. इलेक्ट्रीक इंजिनच्या साथीने ही स्कूटर पेट्रोलला प्रति लिटर 70 चे मायलेज देईल.

Web Title: Indian company TVS iQube Hybrid scooter will come ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.