किलर लूक! Royal Enfield लाँच करणार Himalayan 450 cc, बाईक KTM ला देणार टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 10:20 AM2022-01-10T10:20:13+5:302022-01-10T10:20:34+5:30
भारतातील दुचाकी बाजारपेठेतील 350 सीसी विभागात रॉयल एन्फिल्ड हा सर्वाधिक पसंतीचा ब्रँड आहे.
दिग्गज बाईक उत्पादक कंपनी रॉयल एनफिल्डच्या बाइकची (Royal Enfild Bikes) मागणी भारतीय बाजारपेठेत सातत्याने वाढत आहे. भारतातील दुचाकी बाजारपेठेतील 350 सीसी विभागातील हा सर्वाधिक पसंतीचा ब्रँड आहे. आता कंपनी 450 सीसी सेगमेंटमध्येही एन्टर करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपली किलर बाईक रॉयल एन्फिल्ड हिमालयन 450 (Royal Enfield Himalayan 450) लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही बाईक 2023 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केली जाऊ शकते. लूकमध्ये ही बाइक हिमालयन 411 सारखी असेल, परंतु ती अधिक शक्तिशाली इंजिनसह येईल. यामुळे त्याची पॉवर आणि कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 ही एक लिक्विड कूल्ड, सिंगल सिलेंडर मोटर असेल जी 40 Bhp ची कमाल पॉवर जनरेट करते. इतर बाईक प्रमाणे, हिमालयन 450 लो आणि मीड रेंजमध्ये चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करेल. हिमालयन 450 च्या टॉर्कबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जर सध्याच्या हिमालयन 411 cc सांगायचं झालं तर त्यात वापरलेली मोटर 24.3 bhp आणि 32 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड, कॉन्स्टन्ट मेश गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
किती असेल किंमत?
हिमालयन 450 एक ट्रेलिस फ्रेमचा वापर करेल तसंच हिमालयन 411 च्या तुलनेत ही बाईक हलकी असण्याची शक्यता आहे. हिमालयन 411 मध्ये वापरल्या जाणार्या पारंपारिक टेलिस्कोपिक फोर्कच्या तुलनेत यात पुढे युएसडी फोर्क्स असतील. फ्रंट सस्पेंशन ट्रॅव्हल आणि ग्राउंड क्लीयरन्स उत्तम असण्याची शक्यता आहे. Royal Enfield Himalayan 450 ची किंमत सुमारे रु. 2.7 लाख (एक्स शोरुम) असण्याची शक्यता आहे. ती KTM 390 Adventure (3.28 लाख रुपये) आणि BMW G310GS (3 लाख रुपये) यांना टक्कर देईल, परंतु ही बाईक या दोन्हीपेक्षा स्वस्त असू शकते.
2022 मध्ये टू व्हिलर कंपनी रॉयल एन्फिल्ड आपल्या तीन नव्या मोटरसायकल लाँच करण्याच्या तयारीत आहे. तर कंपनी आपल्या काही मोटरसायकल्स अपडेटही करू शकते.