'या' आहेत शानदार फॅमिली बाईक्स, ऑन-रोड किंमत 1 लाख 10 हजार रुपयांपेक्षा कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 03:33 PM2023-04-16T15:33:04+5:302023-04-16T15:33:22+5:30
आम्ही तुम्हाला अशा बाईक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत ऑन रोड जवळपास 1 लाख 10 हजार रुपये आहे.
नवी दिल्ली : जर तुम्ही दैनंदिन वापरासाठी बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 1 लाख किंवा 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत असेल, तर आम्ही तुम्हाला अशा बाईक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत ऑन रोड जवळपास 1 लाख 10 हजार रुपये आहे.
Hero Super Splendor Xtec
Hero Super Splendor Xtec नुकतेच भारतीय बाजारात 83,437 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. कंपनीने या बाईकमध्ये अतिरिक्त हायटेक फीचर्स जोडले आहेत. जर तुमचे बजेट 1 लाखांच्या आत असेल तर तुम्ही ही बाईक पर्याय म्हणून निवडू शकता.
Bajaj Pulsar 125
बजाज पल्सर 125 ची सुरुवातीची किंमत जवळपास 82,712 हजार रुपये दिल्लीत (एक्स-शोरूम) आहे. पल्सर 125 च्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 124.4cc सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे, जे 8,500rpm वर 11.64bhp ची कमाल पॉवर आणि 6,500rpm वर 10.80Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, ते ट्रान्समिशनच्या पाच-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
Suzuki Gixxer/SF
Suzuki Gixxer आणि Suzuki Gixxer SF या 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या बाईक्सच्या यादीत खूप लोकप्रिय बाईक्स आहेत. या बाईक्समध्ये बसवलेले इंजिन 14.8hp आणि 14Nm टॉर्क जनरेट करते. Suzuki Gixxer किंमत 92,807 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
TVS Raider
भारतीय दुचाकी उत्पादक TVS ची ही बाइक गेल्या वर्षी बाजारात दाखल झाली होती. कंपनीने तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून बाईकची डिझाईन केली आहे. TVS कंपनी भारतीय बाजारात या बाइकला एक्स-शोरूममध्ये 99,990 रुपयांना विकते. ही किंमत अलीकडेच लाँच झालेल्या TFT स्क्रीन आणि 'SmartXonnect' टेक्नॉलॉजी असलेल्या TVS Raider ची आहे.
टीप: वर नमूद केलेल्या बाईक्सच्या किमती बदलू शकतात. अचूक किंमत जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या डीलरशीपशी संपर्क साधा.