Royal Enfield नं आपली 120 वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्तानं कंपनीनं आपल्या पॉप्युलर 650 ट्विन मोटरसायकल Interceptor 650 आणि Continental GT 650 चं 120वं अॅनव्हर्सरी एडिशन सादर केलं. या बाईक्स EICMA 2021 (मिलान मोटरसायकल शो) मध्ये सादर करण्यात आल्या. या लिमिटेड एडिशन बाईक्सची केवळ ४८० युनिट्स जगभरात तयार करण्यात येणार आहे. याची विक्री भारत, युरोप. अमेरिका आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये करण्यात येईल. भारतात या दोन्ही बाईक्सच्या 120 युनिट्सची विक्री केली जाईल.
काय आहे लिमिटेड एडिशनमध्ये खास?120 व्या अॅनिव्हर्सरी एडिशन खास बनवण्यासाठी त्या युके आणि भारतीय टीमनं डिझाईन आणि हँडक्राफ्ट केल्याआहेत. या बाईकमध्ये युनिक, रिच ब्लॅक, क्रोम टँक देण्यात आला आहे. रॉयल एन्फिल्डच्या चेन्नई येथील प्रकल्पात हे डेव्हलप करण्यात आलंय. टँक सोबत पहिल्यांदाच दोन्ही बाईक्समध्ये पूर्णपमे ब्लॅक्ड आऊट पार्ट्स आणि ब्लॅक कलरचं इंजिन, सायलेन्सर आणि अन्य एलिमेंट्स देण्यात आले आहेत.
ही बाईक फ्लायस्क्रिन, हील गार्ज, टुरिंग आणि बार एन्ड मिररसारख्या अॅक्सेसरीजसह येते. यामध्ये हँडक्राफ्टेड टँक बेजिंगही देण्यात आलंय. ही बाईक खास बनवण्यासाठी यावर बाईकचा युनिक सीरिअल नंबरही लिहिला जाणार आहे. याच्या इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये पूर्वीप्रमाणेच 648 सीसी पॅरलल ट्विन इंजिन देण्यात आलंय. ते 47Bhp ची पॉवर आणि 52Nm चा टॉर्क जनरेट करते. यामध्ये 6 स्पीड गिअरबॉक्सही देण्यात आलाय.
कधी खरेदी करता येणार?भारतात 120 अॅनिव्हर्सरी ट्विन्स ६ डिसेंबर रोजी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करता येईल. ऑनलाइन विक्रीसाठी ही बाईक ठराविक कालावधीतच उपलब्ध असेल. ज्यांना ही बाईक खरेदी करायची असेल त्यांना 24 नोव्हेंबर रोजी नोंदणी करता येईल. विक्रीची प्रक्रिया संबंधित व्यक्तीच्य ईमेलवर पाठवली जाईल.