नवी दिल्ली : महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) ही कार सेक्टरमधील सर्वात मोठी एसयूव्ही रेंज असलेली कंपनी आहे. ज्यामध्ये महिंद्रा थार ते XUV700 पर्यंत शानदार आणि लोकप्रिय एसयूव्ही सामील आहेत. दरम्यान, महिंद्राच्या या एसयूव्ही रेंजमधून सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट एसयूव्ही महिंद्रा केयूव्ही 100 एनएक्सटी (Mahindra KUV 100 NXT) आहे. ही कार किमतीव्यतिरिक्त डिझाइन, इंजिन आणि फीचर्समुळे बाजारात टिकून आहे. जर तुम्ही कमी बजेटमध्ये एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर महिंद्रा केयूव्ही 100 एनएक्सटीची किंमत, इंजिन, मायलेज आणि फीचर्स याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Mahindra KUV100 NXT ची किती आहे किंमत?महिंद्रा केयूव्ही 100 एनएक्सटीच्या किंमती 6.18 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होतात आणि टॉप व्हेरिएंटसाठी 7.92 लाख रुपयांपर्यंत आहे.
Mahindra KUV100 NXT मध्ये किती आहेत व्हेरिएंट?कंपनीने चार ट्रिम्ससह महिंद्रा केयूव्ही 100 एनएक्सटी बाजारात लॉन्च केली आहे, ज्यामध्ये पहिली ट्रिम K2+, दुसरी K4+, तिसरी K6+ आणि चौथी ट्रिम K8 आहे.
Mahindra KUV100 NXT आसन क्षमता किती आहे?महिंद्राने या एसयूव्हीमध्ये दोन आसन व्यवस्थेचा ऑप्शन दिला आहे, ज्यामध्ये पहिली 5 सीटर आणि दुसरी 6 सीटर आहे.
Mahindra KUV100 NXT इंजिन आणि ट्रान्समिशनमहिंद्रा केयूव्ही 100 एनएक्सटीमध्ये कंपनीने 1198 सीसीचे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे, ज्यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे. हे इंजिन 82 पीएस पॉवर आणि 115 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
Mahindra KUV100 NXT मायलेज किती आहे?महिंद्राचा दावा आहे की, महिंद्रा केयूव्ही 100 एनएक्सटी एक लिटर पेट्रोलवर 18.15 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.
Mahindra KUV100 NXT मध्ये फीचर्स काय आहेत?महिंद्रा केयूव्ही 100 एनएक्सटीमध्ये, कंपनीकडून ब्लूटूथ आणि ऑक्स केबल कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ आणि कॉलिंग कंट्रोल्स, हाइट अॅडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, मॅन्युअल एसी, पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडो यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
Mahindra KUV100 NXT मधील सेफ्टी फीचर्स काय आहेत?सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर महिंद्रा केयूव्ही 100 एनएक्सटीमध्ये, कंपनीने फ्रंटमध्ये ड्युअल एअरबॅगचा सेटअप, ईबीडीसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, रिअर पार्किंग सेन्सर्स यांसारखी फीचर्स दिली आहेत.
Mahindra KUV100 NXT ची कोणाशी होणार स्पर्धा?महिंद्रा केयूव्ही 100 एनएक्सटी ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील मारुती इग्निस, टाटा पंच, ह्युंदाई ग्रँड i10 निओस यासारख्या कारसोबत स्पर्धा होत आहे.