मारुती सुझुकी 'या' कार कायमच्या बंद करणार? आहेत सर्वाधिक लोकप्रिय...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 11:38 AM2018-12-24T11:38:10+5:302018-12-24T11:46:31+5:30

देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी मारुती सुझुकी 2020 पासून त्यांच्या सर्वाधिक खपाच्या डिझेल इंजिनच्या कार बंद करण्याच्या तयारीत आहे.

Maruti Suzuki could be discontinued Baleno, Swift, Dzire diesel | मारुती सुझुकी 'या' कार कायमच्या बंद करणार? आहेत सर्वाधिक लोकप्रिय...

मारुती सुझुकी 'या' कार कायमच्या बंद करणार? आहेत सर्वाधिक लोकप्रिय...

Next

मुंबई : देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी मारुती सुझुकी 2020 पर्यंत त्यांच्या सर्वाधिक खपाच्या डिझेल इंजिनच्या कार बंद करण्याच्या तयारीत आहे. भारत स्टेज 6 उत्सर्जन नियमावली लागू होण्याचे कारण यामागे आहे. BS6 मध्ये डिझेल इंजिनांवर बंदी नसली तरीही कंपनी केवळ पेट्रोल इंजिनांच्या कार विकणार आहे. 


2020 पासून देशात BS6 सुरु होणार आहे. याच्या तयारीला अनेक कंपन्या लागल्या असून काहींनी एकमेकांची इंजिने वापरण्यासाठी करारही केले आहेत. मात्र, देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी मारुतीने याची धास्ती घेतलेली आहे. महत्वाचे म्हणजे मारुतीने दोन वर्षांपूर्वीच स्व:ताची इंजिने बनविण्यासाठी मोठी गुंतवणूक केलेली आहे. आतापर्यंत मारुती फियाटची इंजिने आपल्या कारमध्ये वापरत होती. 


BS6 नियमावलीमुळे अनेक कंपन्यांना या श्रेणीची इंजिने बनविण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागली आहे. मात्र, पेट्रोलच्या इंजिनापेक्षा डिझेलचे इंजिन जास्त प्रदूषण करत असल्याने या इंजिनाच्या विकासासाठी कंपन्यांना मोठा खर्च येत आहे. मारुतीलाही पेट्रोल इंजिनापेक्षा 2.5 लाख रुपये अधिकचा खर्च डिझेलच्या इंजिनावर येणार आहे. यामुळे स्विफ्ट, डिझायर आणि बलेनोची डिझेल मॉडेल कंपनी बंद करण्याच्या विचारात आहे. अन्यथा या गाड्यांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. 




सध्या दोन्ही इंधनांच्या इंजिनांचा खर्च व्हेरिअंटनुसार एक लाखांचा आहे. हा फरक 12 ते 13 लाखांच्या कारमध्ये सारखाच आहे. मात्र, BS6 लागू झाल्यानंतर नवीन डिझेल इंजिनासाठी 1 ते 1.5 लाखांचा जादाचा खर्च येणार असून यामुळे गाड्यांच्या किंमतीही 2.5 लाखांनी वाढणार आहेत.


हिशेब घातल्यास, दिवसाला 60 ते 70 किमी गाडीचे रनिंग असल्यास 4-5 वर्षांत सध्याची 1 लाखांची जादा जात असलेली रक्कम वसूल होते. यानुसार जर आणखी 1.5 लाख रुपये वसूल करायचे झाल्यास 10 वर्षे जाणार आहेत. पुढील 10 वर्षांचा विचार करता या गाड्या बंद होण्याची शक्यता आहे. सध्या दिल्लीमध्ये 10 वर्षे जुन्या कारवर बंदी आहे. यावर मारुतीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनीही खुलासा केला असून डिझेल इंजिनांच्या कारवर गुंतवणूक करण्यामध्ये काही अर्थ नसल्याचे म्हटले आहे. 

Web Title: Maruti Suzuki could be discontinued Baleno, Swift, Dzire diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.