Maruti Suzuki to Shift Flex Fuel: मारुती डिझेलनंतर पेट्रोल गाड्याही बंद करणार? या नव्या इंधनावर येतेय सेलेरिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 01:09 PM2022-03-27T13:09:31+5:302022-03-27T13:10:17+5:30
Maruti Suzuki Celerio on Flex Fuel: देशातील सर्वाधिक मायलेजची कार मारुती सेलेरियोचा सीएनजी व्हेरिअंट देखील लाँच करण्यात आला आहे. Maruti Suzuki Celerio S-CNG चे सीएनजीमधील मायलेजही खतरनाक आहे.
देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकीने दोन वर्षांपूर्वी मोठा निर्णय घेतला होता. डिझेलच्या गाड्या बनविणे बंद केले होते. पेट्रोल तसेच सीएनजी गाड्या बनविण्यास प्राधान्य दिले होते. आता मारुती नव्या इंधनावरील गाडी आणणार आहे. मारुतीची नुकतीच लाँच झालेली सेलेरिओ या नव्या इंधनावरील टेस्टिंगवेळी दिसली आहे.
नितीन गडकरींनी अनेक कंपन्यांना फ्लेक्स फ्युअलवर कार लाँच करण्याचे आदेश दिले होते. अनेक कंपन्यांकडे फ्लेक्स फ्युअलवर चालणाऱ्या गाड्या आहेत. त्या परदेशात विकल्या जातात. भारतात विक्री का केली जात नाही अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आता मारुतीने यास सुरुवात केली आहे.
पेट्रोल, डिझेलच्या किंमती गगणाला भिडलेल्या आहेत. अशावेळी मारुतीने मोठा गेम सुरु केला आहे. सीएनजी बाजारातील बादशाह असलेल्या मारुतीने फ्लेक्स फ्युअलवर गाड्या आणण्याचे ठरविले आहे. या इंजिनाची कार सेलेरिओ दिल्लीत टेस्टिंगवेळी दिसली आहे.
देशातील सर्वाधिक मायलेजची कार मारुती सेलेरियोचा सीएनजी व्हेरिअंट लाँच करण्यात आला आहे. Maruti Suzuki Celerio S-CNG चे सीएनजीमधील मायलेजही खतरनाक आहे. एका किलोला ३५.६० किमीची रेंज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सेलेरियो ही मारुतीची सहावी सीएनी कार आहे.
भारतीय बाजारात सेलेरियोची किंमत 6.58 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. ही सीएनजी कार VXi व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. पेट्रोलच्या तुलनेत ही कार 45,000 रुपयांनी महाग आहे. यामध्ये K10C पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
मारुती सुजुकी सेलेरियो S-CNG मध्ये बसविण्यात आलेले इंजिन 5300 आरपीएम वर 41.7kW ची ताकद निर्माण करते. पेट्रोलचे इंजिन 5500 आरपीएमवर 48.0kW एवढी ताकद निर्माण करते. Maruti Suzuki Celerio मध्ये 5-स्पीड मैनुअल गियरबॉक्स मिळतो. सीएनजीसाठी ६० लीटरची टाकी देण्यात आली आहे.