आता घड्याळाद्वारे अनलॉक करता येणार कार, हे जबरदस्त स्मार्टवॉच होणार लाँच 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 05:44 PM2021-11-27T17:44:17+5:302021-11-27T17:44:49+5:30

smartwatches for car : चीनमधील कार निर्माता कंपनी BYD लवकरच एक खास स्मार्टवॉच लॉन्च करणार आहे, ज्यामुळे त्यांच्या गाड्या अनलॉक करता येतील.

The most useful smartwatches for car owners are in China. With their help, you can start a car, open doors and trunk, turn on the air conditioner | आता घड्याळाद्वारे अनलॉक करता येणार कार, हे जबरदस्त स्मार्टवॉच होणार लाँच 

आता घड्याळाद्वारे अनलॉक करता येणार कार, हे जबरदस्त स्मार्टवॉच होणार लाँच 

Next

नवी दिल्ली : आजच्या काळात आपले प्रत्येक काम तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टफोनपासून ते स्मार्ट कारपर्यंत सर्व काही इंटरनेट आणि तंत्रज्ञानावर चालते. चिनी कार निर्माता, BYD ने अलीकडेच आपल्या लेटेस्ट कारमध्ये एक नवीन फीचर देण्यास सुरुवात केली आहे, जे तुम्हाला स्मार्टफोन तसेच स्मार्टवॉचवरून कार अनलॉक करता येणार आहे. चला जाणून घेऊया, या शानदार स्मार्टवॉचबद्दल...

चीनमधील कार निर्माता कंपनी BYD लवकरच एक खास स्मार्टवॉच लॉन्च करणार आहे, ज्यामुळे त्यांच्या गाड्या अनलॉक करता येतील. याबाबत अद्याप अधिकृतरीत्या कशाचीही पुष्टी झालेली नसली तरी या स्मार्टवॉचमध्ये स्मार्ट इग्निशन, कम्फर्टेबल एंट्री, स्मार्ट लॉकिंग, आरसे वर आणि खाली करण्याची सुविधा आणि टेलगेट उघडण्याचे फीचर्स मिळतील, असे सांगितले जात आहे.

BYD च्या या स्मार्टवॉचमध्ये गाड्या लॉक आणि अनलॉक करण्याचे फीचर असणार आहे. त्यामुळे असणार असल्याने या गाड्यांच्या मालकांना चावीची गरज भासणार नाही. ते चावी न घेता घराबाहेर पडू शकतात, फक्त त्यांच्या स्मार्टवॉचसह गाडी घेऊन जाऊ शकतात. अशा प्रकारे, चावी हरवण्याची भीती राहणार नाही कारण स्मार्टवॉच व्यक्तीच्या मनगटावर राहील आणि ती चावी असेल तर ती हरवण्याची भीती राहणार नाही.

स्मार्टवॉचमध्ये हेल्थ फीचर्स असणार
या स्मार्टवॉचमध्ये सॅफायर ग्लास स्क्रीन आणि रबर स्टेप्स मिळतील. यानंतर तुम्हाला स्टेप्स काउंटर, एक्सरसाइज पेडोमीटर, हार्ट रेट मॉनिटर, स्लीप मॉनिटर आणि तापमान मापन सुविधा यासह अनेक हेल्थ फीचर्स मिळतील. हे स्मार्टवॉच डिसेंबरपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होईल पण सध्यातरी त्याच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Web Title: The most useful smartwatches for car owners are in China. With their help, you can start a car, open doors and trunk, turn on the air conditioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.