लवकरच लॉन्च होणार Hyundai Santro कार, जाणून घ्या खासियत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 03:46 PM2018-10-19T15:46:46+5:302018-10-19T15:49:15+5:30

Hyundai ची नवीन सॅंट्रो २३ ऑक्टोबरला अधिकृतपणे लॉन्च केली जाणार आहे. दिवाळी या कारचं लॉन्चिंग होणार असल्याने कार बाजारात उत्सुकता आहे.

New Hyundai Santro to be launched soon, Know everything here | लवकरच लॉन्च होणार Hyundai Santro कार, जाणून घ्या खासियत!

लवकरच लॉन्च होणार Hyundai Santro कार, जाणून घ्या खासियत!

Next

Hyundai ची नवीन सॅंट्रो २३ ऑक्टोबरला अधिकृतपणे लॉन्च केली जाणार आहे. दिवाळी या कारचं लॉन्चिंग होणार असल्याने कार बाजारात उत्सुकता आहे. या कारची बुकिंग आधीपासूनच सुरु झाली आहे. असे सांगितले जात आहे की, २२ ऑक्टोबरपर्यंत बुकिंग केली जाणार आहे. पहिले ५० हजार ग्राहक टोकन अमाऊंट दिल्यावर ११ हजार रुपये देऊन कार बुक करु शकतात. या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे फायदेही मिळू शकतात. चला जाणून घेऊ या कारची खासियत...

नव्या सॅंट्रोचा लूक

नवीन सॅंट्रो जुन्या कारप्रमाणे टॉलबॉय लूकसारखी आहे. पण ही कार जुन्या कारपेक्षा लांबीने ६० मिमी लहान आहे. कंपनीने ही कार आपल्या नव्या प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. यावरच आधी i10 कार तयार करण्यात आली होती. यावेळी या कारमध्ये ब्लॅक फ्रन्ट ग्रीलसोबत फॉग लाईट दिले आहे. पण या कारच्या टॉप मॉडलमध्ये अलॉय व्हिल्स दिले नाहीयेत. 

इंटेरिअर 

सॅन्ट्रोच्या या नव्या कारमध्ये फार आकर्षक इंटेरिअर दिलं आहे. रेनॉ क्विड आणि न्यू दॅटसन गो प्रमाणे या कारच्या टॉप व्हेरिएंटमध्ये ७ इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले दिला गेला आहे. अॅन्ड्रॉईड ऑटो आणि अॅपल कार प्ले असलेली इन्फोटेन्मेंट सिस्टीम यात दिली आहे. याने इंटेरिअऱ अधिक आकर्षक झालं आहे. 

सेफ्टी फीचर्स

सेफ्टीबाबत या कारचे फीचर फारच दमदार आहेत एबीएस आणि सिंगल एअरबॅग स्टॅंडर्डमुळे ही कार या सेगमेंटच्या कार्समध्ये वेगळं ठरवतात. या सेगमेंटच्या केवळ मारुतीच्या सेलेरिओमध्येच ड्रायव्हरसाठी एअऱबॅग दिली आहे. नव्या सॅंन्ट्रोमध्ये पार्किंग सेंसर्सही दिले गेले आहे.

इंजिन

सॅंट्रोमध्ये १.१ लिटर फोर सिलेंडर इंजिन दिलं आहे. जे ९६ पीएसी पॉवर आणि ९९ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं. यात कंपनीने फिटेड सीएनजी किटही दिली आहे. या कारचं सीएनजी व्हेरिएंट ५९ पीएस पॉवरसोबत ८४ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. तसेच या कारमधील इंजिन फाईव्ह स्पीड मॅन्युअल गिअऱबॉक्स आहे. 

किती आहे किंमत?

Hyundai आपल्या या नव्या कारच्या किंमतीचा खुलासा २३ ऑक्टोबरला लॉन्चिगवेळी करणार आहे. पण असे मानले जात आहे, याची सुरुवातीची किंमत ३.७ ते ३.८ लाख ठेवली जाऊ शकते. तर मार्केटमध्ये चर्चा आहे की, या कारच्या सीएनजी मॉडलची किंमत ५ लाख रुपये असू शकते. 
 

Web Title: New Hyundai Santro to be launched soon, Know everything here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.