गुड न्यूज! लवकरच येतंय Mahindra Thar चे 5 डोर व्हर्जन; कधी होणार लॉंच? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 10:38 PM2021-05-29T22:38:13+5:302021-05-29T22:39:12+5:30

Mahindra Thar: महिंद्रा कंपनीकडून या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे. 

now mahindra thar 5 door suv confirmed and to be launched in 2023 | गुड न्यूज! लवकरच येतंय Mahindra Thar चे 5 डोर व्हर्जन; कधी होणार लॉंच? पाहा

गुड न्यूज! लवकरच येतंय Mahindra Thar चे 5 डोर व्हर्जन; कधी होणार लॉंच? पाहा

googlenewsNext

नवी दिल्ली: देशातील विविध प्रकारची वाहन उत्पादन करणाऱ्या Mahindra & Mahindra कंपनीने अलीकडील काळात एकापेक्षा एक मॉडेल बाजारात सादर करून भारतीयांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्वदेशी वाहन निर्माती कंपनी असलेली महिंद्रा कंपनी आता आपल्या लोकप्रिय Mahindra Thar या कारचे फाइव्ह डोअर व्हर्जन आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. (now mahindra thar 5 door suv confirmed and to be launched in 2023)

महिंद्रा कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२६ पर्यंत महिंद्रा ९ नवीन कार्स किंवा कार्सचे नवीन व्हर्जन बाजारात सादर करणार आहे. यामध्ये महिंद्रा थार या कारच्या ५ डोअर व्हर्जनचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. महिंद्रा कंपनीकडून या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे. 

मस्तच! आता लवकरच येतेय Mahindra Thar चे स्वस्त मॉडेल; पाहा, डिटेल्स

कधी होणार लाँच?

Mahindra Thar खरेदीचे अधिकाधिक ग्राहकांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी या कारचे  नवीन बेस व्हेरिएंट आणणार आहे. कंपनी या कारला लोव्हर कॅपिसिटी इंजिनसोबत बाजारात आणले जाणार आहे. त्यानंतर याच कारचे ५ डोअर व्हर्जन लाँच केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महिंद्रा थार या कारला Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये ४ स्टार रेटिंग मिळाली आहे. या व्यतिरिक्त कार साइड इंपॅक्ट क्रॅश टेस्टमध्ये देखील पास झाली. महिंद्रा थारला चाइल्ड प्रोटेक्शन रेटिंगमध्ये ४ स्टार मिळाले.

मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्स पर्याय

Mahindra थारच्या या बेस व्हेरिंएंटमध्ये १.५ लीटर, ३ सिलेंडर इंजिन मिळू शकते, ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्स पर्यायासोबत येईल. कार ४ व्हील ड्राइव्हसोबत येणार नाही. कारमध्ये रियर व्हील ड्राइव्ह सिस्टम मिळेल, असे सांगितले जात आहे. 

Web Title: now mahindra thar 5 door suv confirmed and to be launched in 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.