आता खरी फाईट! क्रेटाला टक्कर देण्यासाठी येतेय Tata Blackbird एसयूव्ही, लुक बघूनच प्रेमात पडाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 12:44 AM2022-09-01T00:44:39+5:302022-09-01T00:47:35+5:30

टाटा ब्लॅकबर्डचा सामना ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस सारख्या कारसोबत असेल.

Now the real fight! Tata Blackbird SUV is coming to compete with hyundai Creta, you will fall in love just by looking at the look | आता खरी फाईट! क्रेटाला टक्कर देण्यासाठी येतेय Tata Blackbird एसयूव्ही, लुक बघूनच प्रेमात पडाल

आता खरी फाईट! क्रेटाला टक्कर देण्यासाठी येतेय Tata Blackbird एसयूव्ही, लुक बघूनच प्रेमात पडाल

googlenewsNext

टाटा मोटर्स लवकरच एक नवीन SUV घेऊन येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, कंपनी देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV, Tata Nexonवर आधारित SUV Coupe वर काम करत आहे. या कारला 1.5-लीटर पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. ही सब-कॉम्पॅक्ट नेक्सॉनपेक्षा अधिक लांब असेल. हिची लांबी  जवळपास 4.3 मीटर एवढी असेल. टाटा ब्लॅकबर्डचा सामना ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस सारख्या कारसोबत असेल. Nexon Coupe ही रेग्युलर नेक्सॉनच्या X1 आर्किट्रेक्चरवरच तयार केली जाईल. या शिवाय हिच्यात साईजनुसार काही मॉडिफिकेशनही केले जाऊ शकतात. 

गाडीची लांबी वाढविण्यासाठी मागचा भाग स्ट्रेच केला जाऊ शकतो. हिच्या व्हीलबेसमध्ये 50mm ची वाढ होण्याचीही शक्यता आहे. तसेच, रेग्युलर नेक्सॉनपेक्षा वेगळी बनवण्यासाठी हिच्यात काही बाह्य बदल होणे अपेक्षित आहे. हिच्या पुढील आमि मागील बाजूसही काही बदल केले जाऊ शकतात. मात्र, ए पिलर्स आणि फ्रंट दरवाजा तसाच ठेवला जाईल.

Nexon Coupe मध्ये नवे 1.5-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. जे 160 hp चा मॅक्सिमम पॉवर आउटपुट देऊ शकेल. 1.5-लिटर रेव्होटॉर्क डिझेल इंजिनला  अधिक पॉवर आणि टॉर्क आउटपुट देण्यासाठी अपग्रेड केले  जाईल. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक, अशा दोन्ही ट्रांसमिशनमध्ये ऑप्शन मिळेल.

खरे तर, टाटा ब्लॅकबर्डची कंपनी बऱ्याच दिवसांपासून तयार करत आहे. गेल्या 2018 पासून या गाडीची चर्चा सुरू आहे. महत्वाचे म्हणजे, या एसयूव्हीच्या फीचर्ससंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही.
 

Web Title: Now the real fight! Tata Blackbird SUV is coming to compete with hyundai Creta, you will fall in love just by looking at the look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.