Ola इलेक्ट्रीक स्कूटरनंतर कार आणणार? सीईओ भाविश अग्रवाल यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 04:10 PM2021-08-20T16:10:01+5:302021-08-20T16:11:56+5:30
Ola Electric Car soon: Ola चे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर ओला स्कूटर (Ola Scooter) चा फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिले होते की, पेट्रोलला हटवा, भविष्य इलेक्ट्रीकचे आहे. यावर त्यांना एक ट्विटर युजर बनी पुनियाने प्रश्न विचारला.
Ola Scooter ची स्कूटर अद्याप रस्त्यावर उतरलेली नसली तरी देखील तिचे लाँचिंग झाले आहे. किंमत जरा जास्त वाटत असली तरी लाखो बुकिंग मिळाली आहेत. आता ओलाचे सीईओ आणखी एका बड्या धमाक्याची तयारी करत आहेत. ट्विटरवर एका युजरला उत्तर देताना त्यांनी 2023 पर्यंत ओलाची Electric Car लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. (Ola CEO Confirms Launch of Brand's First Electric Car by 2023, Vehicle in Research Phase)
Ola चे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर ओला स्कूटर (Ola Scooter) चा फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिले होते की, पेट्रोलला हटवा, भविष्य इलेक्ट्रीकचे आहे. यावर त्यांना एक ट्विटर युजर बनी पुनियाने प्रश्न विचारला. तुमच्याकडे स्वत:ची खासगी कार कोणती आहे? पेट्रोल, डिझेल की इलेक्ट्रीक. यावर त्यांनी माझ्याकडे एक हायब्रिड कार असल्याचे सांगितले.
Reject Petrol! Future is Electric 🙂🇮🇳 pic.twitter.com/3YrP9VHeJC
— Bhavish Aggarwal (@bhash) August 16, 2021
भाविश यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी माझ्याकडे कोणतीही कार नव्हती. आता एक हायब्रिड कार आहे. पुढील कार इलेक्ट्रीक असेल 2023 मध्ये, ती देखील ओलाची इलेक्ट्रीक कार.
महत्वाचे म्हणजे भाविश यांनी याआधीही एकदा Ola Electric Car बाबत ट्विट केले होते. मात्र, ते एप्रिल फूल होते. त्यांनी ओलाच्या इलेक्ट्रीक फ्लाईंग कारचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यानंतर लोकांना ते एप्रिल फुलची गंमत असल्याचे समजले होते.
Is your own private car a petrol or a diesel. Or electric?
— Bunny Punia (@BunnyPunia) August 16, 2021
आता भाविश यांनी पुन्हा एकदा 2023 पर्यंत इलेक्ट्रीक कार लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. परंतू त्यांनी डोळा मारतानाची स्माईली वापरली आहे. अशावेळी ते खरोखरच 2023 पर्यंत इलेक्ट्रीक कार आणतात का हे पहावे लागेल.