शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

Ola S1 ची विक्री उद्यापासून सुरू होणार; खरेदी करण्यापूर्वी  जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2022 3:36 PM

Ola S1 Electric Scooter : आता कंपनी 2 सप्टेंबर 2022 पासून या स्कूटरच्या विक्रीसाठी खरेदी विंडो उघडत आहे. कंपनीने स्कूटर सुरुवातीची किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) सह बाजारात आणली आहे.

नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) आपली दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस 1 (Ola S1) 15 ऑगस्ट रोजी लाँच केली होती. आता कंपनी 2 सप्टेंबर 2022 पासून या स्कूटरच्या विक्रीसाठी खरेदी विंडो उघडत आहे. कंपनीने स्कूटर सुरुवातीची किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) सह बाजारात आणली आहे. या Ola S1 लाँच केल्यानंतर ओला इलेक्ट्रिकने अधिकृतपणे या स्कूटरची प्री-बुकिंग सुरू केली होती, ज्यासाठी कंपनीने 499 रुपये टोकन रक्कम निश्चित केली होती.

आता कंपनीने स्कूटरचे प्री-बुकिंग बंद केले आहे. तर 2 सप्टेंबरपासून या स्कूटरची विक्री सुरू करणार आहे. स्कूटरची विक्री 2 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, परंतु ज्या ग्राहकांनी कंपनीच्यावतीने ही स्कूटर बुक केली आहे, त्यांना 1 सप्टेंबर रोजी संपूर्ण पैसे भरून ही स्कूटर खरेदी करण्याचा ऑप्शन दिला जात आहे. तसेच, कंपनी 7 सप्टेंबरपासून या स्कूटरची डिलिव्हरी सुरू करणार आहे.

लोकांचे बजेट लक्षात घेऊन कंपनी हा Ola S1 खरेदी करण्यासाठी फायनान्स प्लॅनचा ऑप्शन सुद्धा देत ​​आहे. या फायनान्स प्लॅन अंतर्गत, ग्राहक ही स्कूटर 2,999 रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकतील आणि कंपनी या फायनान्स प्लॅन अंतर्गत दिलेल्या कर्जावर कोणतेही कर्ज प्रक्रिया शुल्क आकारणार नाही. Ola S1 च्या बॅटरी पॅक आणि पॉवरबद्दल बोलताना, कंपनीने यामध्ये 3 kWh क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 141 किलोमीटरची रेंज देईल. याशिवाय, या स्कूटरमध्ये दिलेल्या तीन रायडिंग मोडमध्ये त्याची रेंज वेग-वेगळी असेल.

Ola S1 Colorsसिंगल चार्ज केल्यावर Ola S1 इको मोडमध्ये 128 किमी, नॉर्मल मोडमध्ये 101 किमी आणि स्पोर्ट्स मोडमध्ये 90 किमीची रेंज देते. या रेंजसह 95 किमी प्रतितासचा टॉप स्पीड मिळते. ओला इलेक्ट्रिकने हा ओला Ola S1 पाच कलर ऑप्शनसह बाजारात आणली आहे. पहिला जेट ब्लॅक, दुसरा कोरल ग्लॅम, तिसरा लिक्विड सिल्व्हर, चौथा पोर्सिलेन व्हाइट आणि पाचवा निओ मिंट कलर आहे.

Ola S1 Featuresओला इलेक्ट्रिकने या Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अँटी थेफ्ट अलार्म सिस्टम, जिओ फेन्सिंग, अँटी फायर आणि वॉटर प्रूफ बॅटरी पॅक, हिल होल्ड, नेव्हिगेशन, म्युझिक प्लेबॅक, टीएफटी 7 इंच टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट कन्सोल यासारखे लेटेस्ट आणि हाय-टेक फीचर्स जोडली आहेत.

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन