१२५ सीसी क्षमतेच्या स्कूटरमध्ये सध्या बऱ्यापैकी पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 03:29 PM2018-01-03T15:29:36+5:302018-01-03T15:32:17+5:30

१२५ सीसी ताकदीच्या स्कूटर्समध्ये सध्या ग्रॅझिया, व्हेस्पा व सुझुकी अॅक्सेस या तीन स्कूटर्स बाजारात पर्याय म्हणून राहाता येता. ऑटोगीयरच्या स्कूटरच्या जमान्यामध्ये स्कूटर म्हणजे सुलभ आरामदायी पर्याय म्हणून दुचाकीचालक त्याकडे पाहातात.

options in 125 cc scooters | १२५ सीसी क्षमतेच्या स्कूटरमध्ये सध्या बऱ्यापैकी पर्याय

१२५ सीसी क्षमतेच्या स्कूटरमध्ये सध्या बऱ्यापैकी पर्याय

Next

शहरांमध्ये स्कूटर हा दळणवळणाचा एक चांगला पर्याय ठरला आहे. सामान वाहून नेण्याची क्षमता, हेल्मेट ठेवण्याची सुविधा आणि महिलांनाही चालवण्यासाठी सुलभता या तीन गुणांमुळे सध्याच्या स्कूटर्स या ग्राहक उपयोगी झालेल्या आहेत. त्यातही आता १२५ सीसी इंजिनक्षमतेच्या स्कूटर्स या या आधीच्या ११० सीसी वा १०० सीसी क्षमतेपेक्षा काही जास्त ताकदीच्या व इतके असूनही बऱ्यापैकी मायलेज देणाऱ्या असल्याने लोकांचा कलही त्याकडे वळला आहे. होंडा अॅक्टिव्हा १२५ सीसी स्कूटरीनंतर सध्या नवा पर्याय म्हणून होंडाची ग्रॅझिया, सुझुकीची अॅक्सेस व व्हेस्पा या तीन स्कूटर्स १२५ सीसी मध्ये पर्याय आहेत.
सध्या होंडा  अॅक्टिव्हा अधिक खपाची असल्याचे दिसते खरी परंतु १२५ सीसी ताकदीच्या स्कूटरमध्ये सुझुकी एक्सेसने बाजी मारलेली आहे. त्यामुळे होंडानेही आता ग्रॅिझया ही १२५ सीसी ताकदीची स्कूटर बाजारात आणली आहे, बाजारात आणखी एक १२५ सीसी ची स्कूटर आहे ती म्हणजे व्हेस्पा. मात्र या तीनही वेगळ्या कंपन्यांच्या स्कूटरमध्ये वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा विशेष करून लूकमध्ये फरक दिसतो. त्यामध्ये व्हेस्पा ही स्कूटर मात्र रचना व आरेखनातही पूर्ण वेगळी आहे. 
व्हेस्पा ही स्कूटरमध्ये सर्वात महाग असणारी स्कूटर आहे. इटालियन थीमवर तयार केलेल्या या स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे या स्कूटरची बॉडी ही ट्युब्यूलर नाही. तसेच तिचा लूक क्लासिक आहे. व्हेस्पावरून प्रवास तसा स्मुथ वाटावा असा आहे, स्कूटरला एक स्थिरता आहे, कारण इंिजन वबॉडी यांच्यामध्ये लींक िस्प्रंग तंत्र वापरले आहे. त्यामुळे वेग कोणताही असला तरी आरामात चालते. या स्कूटरला पुढील चाक ११ इंच टायरचे असून मागील १० इंच टायरचे आहगे मात्र शॉकअब्ज चांगले असल्याने छोट्या खड्ड्यांवरून जाताना त्रास होत नाही. मात्र हिची किंमत सुमारे ७० हजार रुपयांपासून सुरू होते.
व्हेस्पा - स्लीम रचनेची व सौंदर्यपूर्ण. क्लासीक लूक असणारी ही स्कूटर असून आसन व हँडल यांच्या रचनेमुळे काहीशी अधिक आरामदायी. डिजिटल स्पीडोमीटर स्कूटरमध्ये प्रथम व्हेस्पाला वापरला गेला होता. पूर्ण पत्रा बॉडी, मोनोकॉक रचना असल्याने अधिक मजबूत व एकसंघता वाटते. १० बीएचपी ताकद.
होंडा ग्रॅझिया -  अॅक्टिव्हा १२५ च्याच पद्धतीचा वापर केला असा तरी स्पोर्टी लूक व नव्या सुविधा यात आहेत.यामध्ये एलईडी हेडलॅम्प, स्टायलिश बनवण्याचा प्रयत्न. ट्यूब्युलर स्टील चासी व फायबरबॉडीचा वापर. कॉम्बी ब्रेक, ८.५ बीएचपी ताकद.
सुझुकी एक्सेस - काहीशी वेगळा लूक देण्यात आला असून इंडिकेटरची रचना, स्विचचे फिनिशिंग, ट्यूब्युलर स्टील चासी व फायबरबॉडी, आसन व्यवस्था सपाट असल्याने रूंदी चांगली वाटते. ८.७ बीएचपी ताकद.
या स्कूटर्सच्या मायलेजचा विचार केला तर सध्याच्या पुणे-मुंबई सारख्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणी खरे म्हणजे मायलेज मिळणे हा नशिबाचा भाग ठरतो. स्टॅण्डर्ड चाचणीमध्ये असणारे मायलेज शहरांमध्ये कधी मिळत नाही. जास्तीत जास्त ४० ते ४५ िकलोमीटर इतके मायलेज प्रति लीटर पेट्रोलला मिळते. शहरातील रस्त्यांची स्थीत, वाहतुकीची स्थिती साधारण १० किलोमीटरपेक्षाही कमी अंतर जाण्यामुळे मिळणारे मायलेज हे खरे पाहिले तर जमेस धरण्यासारखे नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र आज एकंदर शहरी स्कूटर्सचा वापर मायलेजपेक्षा कम्फर्ट यादृष्टीनेच केला जातो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. सपाटीच्या रस्त्यावर ताशी ४५ ते ५० किलोमीटरच्या स्थिर वेगाने मोकळ्या रस्त्यावर व दीर्घ पल्ल्यामध्ये मायलेज नक्कीच चांगले मिळू शकते. मात्र शहरात ते अपेक्षित नक्कीच राहिलेले नाही, अशी स्थिती आहे.

Web Title: options in 125 cc scooters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.