उत्तर प्रदेश आणि पंजाबसह एकूण पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. यातच राजकीय नेत्यांचा कारमधून दौऱ्यांनाही सुरूवात झाली आहे. उत्तर भारतात राजकीय नेत्यांमध्ये आपली दमदार प्रतिमा आणि शक्ती प्रदर्शनासाठी काही खास गाड्यांना पसंती दिली जाते. यात Tata Safari आणि Toyota Fortuner या कारचं नाव आघाडीवर आहे. या दोन कारमध्ये नेमकी कोणती कार वरचढ आहे ते जाणून घेऊयात..
कमी किमतीत 'सफारी'मध्ये 'फोर्च्युनर'चा स्वॅगटाटा सफारी आणि टोयोटा फोर्च्युनर कारच्या किमतीचा विचार करायचा झाल्यास फोर्च्युनरची किंमत नक्कीच टाटा सफारीपेक्षा अधिक आहे. पण टाटा सफारीच्या कमी किमतीत तुम्हाला फॉर्च्युनरसारखी दमदार स्टाइल व स्वॅग मिळतो. फॉर्च्युअर कारची किंमत ३१.३९ लाखांपासून सुरू होते. तर टाटा सफारीची किंमत जवळपास १४.९९ लाखांपासून सुरू होते. यातच राजकीय नेते विशेषत: पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या गाड्यांना अधिक पसंती देतात. यातच टाटा सफारीनं नुकतंच Tata Safari Dark Edition ही नवी एडिशन लॉन्च केली आहे. टाटा सफारीच्या एक्स-शोरुम किंमत १९.०५ लाख रुपयांपासून सुरू होते.
Safari चं मायलेज जास्तपेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता आता मायलेजचा मुद्दा अधिक महत्त्वाचा झाला आहे. टाटा सफारी डिझल इंजिनसह उपलब्ध होते आणि यातील टॉप व्हेरिअंट एका लीटरमध्ये १६.१४ किमी मायलेज देते. तर टोयोटा फॉर्च्युनर पेट्रोल इंजिन कार आहे. यातील टॉप व्हेरिअंटमधून जवळपास १० किमी प्रतिलीटर मायलेज मिळतं. फ्युअल टँकबाबत बोलायचं झाल्यास टाटा सफारीमध्ये ५० लीटर तर फॉर्च्युनरमध्ये ८० लीटर क्षमता आहे.
फॉर्च्युनर पावरफुल कारटाटा सफारीमध्ये २.० लीटर टर्बोचार्झ क्रिओडेक्ट डीझल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 3750rpm वर 167.62bhp पावर निर्माण करतं. तर पॉक टॉर्क 2500rpm वर 350Nm इतकं आहे. दुसरीकडे टोयोटा फॉर्च्युनरमध्ये २.७ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5200rpm वर 163.60bhp ची पावर जनरेट करतं. याचा पीक टॉर्क 4000rpm वर 245Nm इतका आहे. फॉर्च्युनरमध्ये 4x4 ड्राइव्हचा पर्याय देखील उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर फॉर्च्युनर अधिक पावरफुल गाडी आहे. तसंच टाटा सफारीच्या तुलनेत फॉर्च्युनर खूप प्रीमिअम लूक देणारी कार आहे.