पुणे : टाटा मोटर्सने आपली नवी एसयुव्ही कार Harrier लवकरच भारतीय बाजारात आणली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या कारलाटाटाने 2018च्या ऑटो एक्स्पोमध्ये H5X concept म्हणून दाखविण्यात आले होते. Harrier ही कार या कन्सेप्टवरच बनविण्यात आली आहे. या कारला 2019 मध्ये लाँच केले जाणार आहे.
या कारमध्ये स्लीट हेडलाईट देण्यात आले आहेत ज्या एलईडी लाईट असणार आहेत. याशिवाय या कारचे फ्रंट ग्रील अन्य कारपेक्षा वेगळे बनविण्यात आले आहे. Harrier ला बनविण्यासाठी टाटाने जग्वारची मदत घेतली आहे.
टाटाच्या पुण्यातील प्लांटमधून काल पहिली Harrier एसयुव्ही बाहेर पडली. ही SUV कार जीप कंपास, ह्युंदाई टक्सन, क्रेटा या कारना टक्कर देणार आहे. टाटा मोटर्सने टियागोपासून वाहनांचा आणि सेवेचा दर्जा उंचावला आहे. जेडी पावरने नुकत्याच केलेल्या विक्री पश्चात सेवेबाबतच्या सर्व्हेमध्ये टाटा दुसऱ्या क्रमांकावर आहे.