गाडीच्या टायर्सबाबतचाही नियम बदलला, आता ‘अशीच’ टायर्स असलेली वाहनं चालवता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 04:12 PM2022-07-02T16:12:04+5:302022-07-02T16:12:34+5:30

सरकारनं वाहनांना सुरक्षित बनवण्यासाठी ब्रेक, सेन्सर आणि एअरबॅग्ससारखे काही नियम यापूर्वीच तयार केले आहेत. परंतु आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

road transport ministry notifies new standards for vehicle tyres know what are new rules | गाडीच्या टायर्सबाबतचाही नियम बदलला, आता ‘अशीच’ टायर्स असलेली वाहनं चालवता येणार

गाडीच्या टायर्सबाबतचाही नियम बदलला, आता ‘अशीच’ टायर्स असलेली वाहनं चालवता येणार

googlenewsNext

वाहन सुरक्षित करण्यासाठी सरकारने ब्रेक, सेन्सर, एअरबॅग असे अनेक नियम केले आहेत. आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वास्तविक, वाहनांच्या टायरच्या डिझाइनमध्ये बदलांना मान्यता देण्यात आली आहे. टायर्स आता 1 ऑक्टोबरच्या नव्या डिझाईनप्रमाणे तयार केली जातील. पुढील वर्षी 1 एप्रिलपासून नवीन टायरसह वाहनांची विक्री केली जाणार आहे. टायरच्या डिझाईनचे नवीन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील. नवीन मानके टायर्सच्या C1, C2 आणि C3 श्रेणींना लागू होतील.

नवीन टायर डिझाइन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील. AIS-142:2019 टप्पा 2 C1, C2 आणि C3 श्रेणीतील टायरसाठी अनिवार्य आहे. 1 एप्रिल 2023 पासून नवीन वाहनांमध्ये असे टायर ठेवणे बंधनकारक असेल. ऑटोमोटिव्ह इंडियन स्टँडर्ड्स (AIS) नुसार, वाहनाच्या टायर्सची गुणवत्ता आणि डिझाइन आता AIS-142:2019 नुसार असेल.

काय आहे C1, C2 आणि C3?
टायर तयार करण्यासाठी सध्या C1, C2 आणि C3 अशा 3 श्रेणी आहेत. पॅसेंजर कार टायर्सच्या श्रेणीला C1 म्हणतात. C2 म्हणजे छोटे कमर्शिअल व्हेईकल व्आणि C3 म्हणजे हेवी व्हेईकल टायर. आतापासून, ऑटोमोटिव्ह इंडियन स्टँडर्ड (AIS) च्या दुसऱ्या टप्प्यातील काही नियम आणि मापदंड या सर्व टायरच्या श्रेणींना अनिवार्यपणे लागू होतील. रोलिंग रेझिस्टन्स, वेट ग्रिप आणि रोलिंग साऊंड एमिशन्ससारख्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

स्टार रेटिंग सिस्टमही
वाहन चालवताना निर्माण होणारा आवाज लक्षात घेऊन नवीन टायर्स अधिक सुरक्षित केले जातील, सोबतच रस्त्यावरील चांगली वेट ग्रीप, ओल्या रस्त्यावरील पकड आणि जास्त वेगावर नियंत्रण ठेवता येईल. याद्वारे ग्राहकांना खरेदीच्या वेळी टायर किती सुरक्षित आहे हे कळू शकणार आहे. याशिवाय परिवहन मंत्रालय आणि अवजड उद्योग मंत्रालय लवकरच टायर्ससाठी स्टार रेटिंग सुरू करणार आहेत. रेटिंग ग्राहकाला त्याच्या वापरानुसार सर्वोत्तम आणि सुरक्षित टायर निवडण्यास मदत करेल.

कारमध्ये ६ एअरबॅग्स अनिवार्य
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सरकार आठ प्रवासी वाहनांमध्ये किमान सहा एअरबॅग अनिवार्य करणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, वाहनांमध्ये बसणाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कंपन्यांना वाहनांमधील एअरबॅगची संख्या वाढवावी लागेल. त्यांना आठ प्रवासी क्षमता असलेल्या वाहनांमध्ये किमान सहा एअरबॅग्ज बसविण्यास सांगितले जाईल. गडकरींच्या म्हणण्यानुसार, आठ प्रवासी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या अधिसूचनेला त्यांनी मंजुरी दिली आहे.

Web Title: road transport ministry notifies new standards for vehicle tyres know what are new rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.