नवी दिल्ली : रॉयल एनफील्ड कंपनीने आपल्या Classic 350 गनमेटल ग्रेमधील ABS व्हर्जन गाडी भारतात लाँच केली आहे. रॉयल एनफील्ड क्लासिक 350 गनमेटल ग्रे ABS ची किंमत 1.80 लाख रुपये आहे. कंपनीने सध्या गाडीमध्ये अॅन्टी लॉक ब्रेक्स(ABS )ची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे.ABS युनिट गनमेटल ग्रे मॉडेलमध्ये देण्यात आले आहे, त्यामध्ये ड्युअल चॅनल युनिट आहे. युनिटला Signals Edition मध्ये देण्यात आले होते. कंपनीच्या माहितीनुसार, सरकारने दिलेल्या डेडलाइनच्या आधी सर्व गाड्यांमध्ये या नवीन सेफ्टी फीचरचे अपडेट करण्यात येणार आहे. Royal Enfield Classic 350 मॉडेलच्या फ्रंट आणि रिअरमध्ये 280mm व 240mm डिस्क ब्रेक्स देण्यात आला आहे. तसेच, ABS चे फीचर चांगले असल्यामुळे या गाडीच्या किंमतीत दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.ABS याशिवाय या गाडीमध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आला नाही. Classic 350 ABS मध्ये पहिल्यासारखे 346cc, सिंगल सिलिंडर, एअर-कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 19.8bhp ची पॉवर आणि 28Nm चे पिक टॉर्क जेनरेट करते. तसेच, इंजिनला ट्रान्समिशनसाठी 5 स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. दरम्यान, पुढील महिन्यात लाँच होणाऱ्या 650 Twins मध्ये सुद्धा रॉयल एनफील्डनुसार ABS फीचर देण्यात येणार आहे.
नवीन रॉयल एनफील्ड Classic 350 ABS भारतात लाँच, जाणून घ्या किंमत!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 4:32 PM