मार्केटमध्ये येणार Royal Enfield चे तुफान; 2022 मध्ये लाँच होणार 4 नवीन बाईक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 12:34 PM2022-01-22T12:34:57+5:302022-01-22T12:37:29+5:30
Royal Enfield : कंपनीने गेल्या काही दिवसांत अनेक नवीन नावे ट्रेडमार्क केली आहेत आणि रॉयल एनफिल्ड ही नावे आपल्या आगामी बाईक्ससाठी वापरणार आहे.
नवी दिल्ली : रॉयल एनफिल्डची (Royal Enfield) भारतात एकतर्फी बाजारपेठ बनली आहे आणि नवीन वर्षात कंपनी हे वातावरण आणखी गरम करणार आहे. 2022 साठी रॉयल एनफिल्डकडे अनेक नवीन उत्पादने आहेत, जी ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याची योजना आखण्यात आली आहेत.
कंपनी भारतात 4 नवीन बाईक्स आणणार आहे, ज्यामध्ये नवीन जनरेशन रॉयल एनफिल्ड बुलेट 350 (Royal Enfield Bullet 350), क्लासिक बॉबर 350 (Classic Bobber 350), हंटर 350 (Hunter 350) आणि रॉयल एनफील्ड स्क्रीम 411 (Royal Enfield Scream 411) यांचा समावेश आहे. कंपनीने गेल्या काही दिवसांत अनेक नवीन नावे ट्रेडमार्क केली आहेत आणि रॉयल एनफिल्ड ही नावे आपल्या आगामी बाईक्ससाठी वापरणार आहे.
रॉयल एनफिल्ड हंटर 350
चेन्नई स्थित बाईक निर्माता 2022 मध्ये हंटर 350 लाँच करण्यासाठी सज्ज आहे, या बाईकची नुकतीच चाचणी करण्यात आली आहे. लवकरच भारतात येणारी ही बाईक रॉयल एनफिल्ड मिटिओर 350 च्या प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल, परंतु तिचे स्टाइल आणि डिझाइन पूर्णपणे वेगळे असणार आहे. मात्र, नवीन बाईकला ट्रीपर नेव्हिगेशन मिळेल जे मिटिओरसह प्रदान केले जाईल, अशी अपेक्षा आहे.
रॉयल एनफिल्ड बुलेट 350
रॉयल एनफिल्ड या वर्षी देशात नवीन जनरेशन बुलेट 350 लाँच करणार आहे आणि ही बाईक नवीन क्लासिक 350 प्रमाणेच प्लॅटफॉर्मवर तयार केली जात आहे. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नवीन जनरेशनच्या बाईक्सची स्टाईल आणि डिझाइनमध्ये लक्षणीय बदल केले जातील. बाईकमध्ये तांत्रिक सुधारणाही होण्याची शक्यता आहे. नवीन बुलेट 350 मध्ये नवीन 350 cc इंजिन मिळेल जे 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm पीक टॉर्क बनवते. या बाईकला ट्रिपर नेव्हिगेशन देखील मिळणार आहे.
रॉयल एनफिल्ड हिमालयन (Scram 411)
कंपनी 2022 मध्ये हिमालयनचे नवीन मॉडेल लॉन्च करेल, जे भारतीय बाजारपेठेत ऑफ-रोडरपेक्षा वेगळ्या रस्त्यावर धावण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. नवीन बाईकचे नाव Royal Enfield Scram 411 असू शकते, जी हिमालयन आधारित स्क्रॅम्बलर मोटरसायकल आहे. कंपनी या बाईकसोबत सिंगल-पॉड इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि ट्रिपर नेव्हिगेशन देखील देणार आहे.
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बॉबर
रॉयल एनफिल्डच्या नवीन क्लासिक 350 वर आधारित आगामी बॉबर बाईक देखील 2022 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. बाइकला बॉबर स्टाईल देण्यासाठी त्याच प्रकारचे हँडलबार आणि बॉबर सीट सोबत देण्यात येणार आहे. हंटरप्रमाणेच, नवीन मोटरसायकलमध्ये मिटिओर 350 चे इंजिन मिळू शकते. कंपनी या नवीन बाईकद्वारे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांचे लक्ष वेधून घेऊ शकते.