Simple Energy: ओलाला यातही पछाडणार सिंपल वन! इलेक्ट्रीक स्कूटर विश्वातील केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 08:09 PM2021-12-08T20:09:11+5:302021-12-08T20:10:26+5:30

Simple One vs. Ola s1 Electric Scooter: ओलाच्या स्कूटरपेक्षा जास्त रेंज असलेली स्कूटर सिंपल एनर्जीने लाँच केली होती. दोन्ही कंपन्यांनी एकाच दिवशी या स्कूटर लाँच केल्या होत्या. शिवाय ओलाच्या स्कूटरपेक्षा Simple One ची किंमतही खूप कमी आहे.

Simple Energy: Simple One will beat Ola s1 too! worlds biggest Plant will build in Tamilnadu | Simple Energy: ओलाला यातही पछाडणार सिंपल वन! इलेक्ट्रीक स्कूटर विश्वातील केली मोठी घोषणा

Simple Energy: ओलाला यातही पछाडणार सिंपल वन! इलेक्ट्रीक स्कूटर विश्वातील केली मोठी घोषणा

googlenewsNext

सिंपल एनर्जीने (Simple Energy) बुधवारी मोठी घोषणा केली आहे. तामिळनाडू सरकारसोबत मॅन्युफॅक्टरिंग प्लँट स्थापन करण्यासाठी 2500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत करार केला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार हा इलेक्ट्रीक स्कूटरचा जगातील सर्वात मोठा प्लँट असणार आहे. 

काही महिन्यांपूर्वी ओलानेदेखील जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रीक दुचाकी बनविणारी फॅक्टरी टाकल्याचा दावा केला होता. या फॅक्टरीचे नाव फ्युचर फॅक्टरी असे ठेवण्यात आले आहे. ओलाचा देखील तामिळनाडूमध्ये प्लांट आहे. ओलाने या फॅक्टरीमध्ये दरवर्षी 1 कोटी युनिट्स उत्पादित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 

ओलाच्या स्कूटरपेक्षा जास्त रेंज असलेली स्कूटर सिंपल एनर्जीने लाँच केली होती. दोन्ही कंपन्यांनी एकाच दिवशी या स्कूटर लाँच केल्या होत्या. शिवाय ओलाच्या स्कूटरपेक्षा Simple One ची किंमतही खूप कमी आहे. सिंगल चार्जमध्ये मिळते सर्वाधिक 236kms ची रेंज. 
सिंपल एनर्जीने विक्रीच्या खेळातही ओलाला टक्कर देण्याची तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात होसुरच्या शूलगिरीमध्ये 2022 पासून कंपनी दर वर्षी 10 लाख युनिट्स तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या प्लांटमध्ये 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. धर्मपुरीच्या 600 एकर जमिनीवर ही कंपनी उभी राहणार आहे. यामध्ये संशोधन, विकास केंद्र, जागतिक स्तरावरील टेस्टिंग सेंटर आणि एक विक्रेता पार्क उभारला जाईल. 

सिंपल वनमध्ये काय आहे खास?
या स्कूटरमध्ये 4.8 KWh क्षमतेच्या बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. तसंच या स्कूटरची मोटर 4.5 KW क्षमतेची पॉवर जनरेट करते. तसंच ही स्कूटर 2.95 सेकंदात 0 पासून 40 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते असा दावा कंपनीनं केला आहे. या स्कूटरचा सर्वाधिक वेग 105 किमी प्रति तास इतका आहे. 110 किमी वजन असलेल्या या स्कूटरमध्ये 30 लिटरची बुट स्पेस (अंडरसीट स्टोरेज) देण्यात आलं आहे. यामध्ये तुम्ही एक मोठं हेल्मेटही ठेवू शकता. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 236 किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते असा दावा कंपनीनं केला आहे. या प्रकरणी ही स्कूटर ओलाच्या इलेक्ट्रीक स्कूटरला मागे सोडते. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 181 किमी इतकी आहे.

Web Title: Simple Energy: Simple One will beat Ola s1 too! worlds biggest Plant will build in Tamilnadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Olaओला