यंदाच्या स्वातंत्र्य दिनादिवशी दोन ईलेक्ट्रीक स्कूटर लाँच होणार आहेत. एक म्हणजे तुफान प्रतिसाद मिळत असलेली ओला ईलेक्ट्रीक स्कूटर आणि दुसरी ओलाच्या या स्कूटरला सर्वच बाबतीत मागे टाकेल अशी Simple One. ओला स्कूटर येतेय म्हणताच कंपनीने आपल्या स्कूटरचे सारे पत्तेच खोलले आहेत. ओलाची स्कूटर घरोघरी पोहोच केली जाणार आहे, तर सिंपल वन ही सुरुवातीच्या टप्प्यात 13 राज्यांमध्ये आपली डीलरशीप उघडणार आहे. यासाठी 350 कोटी रुपये खर्च करणार आहे. (Simple One High Range Electric Scooter Launch Soon in 13 states including Maharashtra)
Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्ज
सिंपल वन इलेक्ट्रीक स्कूटर 15 ऑगस्टला लाँच होणार आहे. याच दिवशीपासून बुकिंग सुरु होणार आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कूटर तब्बल 240 किमीची रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे. Simple Energy (सिंपल एनर्जी) ही स्कूटर 2021 च्या पहिल्या सहामाहिमध्ये ही स्कूटर लाँच करणार होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हे लाँचिंग टाळण्यात आले. सुरुवातीला जरी ओला स्कूटरची रेंज 240 किमी सांगण्यात येत असली तरीदेखील मीडिया रिपोर्टनुसार ओलाची स्कूटर 150 किमीची रेंज देण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा 90 किमी जास्तची रेंज सिंपल वनची स्कूटर देते.
Ola Scooter ची थेट घरी देणार डिलिव्हरी; 10 रंगात, कर्ज प्रक्रिया, सर्व्हिस कशी मिळणार, जाणून घ्या...
सिंपल एनर्जी ही एक स्टार्टअप कंपनी आहे. भारतातील इलेक्ट्रीक मोबिलिटी क्षेत्रात काही महिन्यांपूर्वीच या कंपनीने एन्ट्री केली आहे. ही कंपनी तामिळाडूच्या होसुरमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. हा प्रकल्प उभारण्याचे काम सुरु झाले आहे. या वर्षाच्या अखेरीस या प्रकल्पातून उत्पादन सुरु करण्याचा विचार कंपनीचा आहे. वर्षाला 10 लाख स्कूटर निर्माण करण्याची क्षमता आहे. या स्कूटरची किंमत 1 लाख ते 1.20 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
Electric Supercar: येड लावणार! भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार Azani येतेय; 700 किमीची जबरदस्त रेंज
१३ राज्यांमध्ये मिळणार...Simple One ही ई स्कूटर दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाना, केरळ, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये विकली जाणार आहे. या राज्यांच्या शहरात एक्सपिरिअन्स सेंटर साठी जागा निवडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर ही शहरे असण्याची शक्यता आहे.
Nitin Gadkari: नितीन गडकरींना कंपन्यांपेक्षा कार मालकांची चिंता; म्हणाले, 'सहा एअरबॅग द्या', पण...