इंजिनाच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे स्पार्क प्लग. पेट्रोल,डिझेल, सीएनजी वा एलपीजी या इंधनावरील वाहनांसाठी इंजिन हे लागतेच व इंजिनात कॉम्प्रेसड् अशा इंधन व हवेला प्रज्वलीत करण्याचे काम करतो तो स्पार्क प्लग. त्याशिवाय इंजिन चालू शकमार नाही. स्कूटर पासून अगदी ट्रक, बस यासारख्या अवजड वाहनापर्यंत या स्पार्क प्लगचे काम अतिशय महत्त्वाचे असते. इंजिनाच्या आत काय आहे हेच जणू हा स्पार्क प्लग डोकावून बघत असतो. त्याची रचना वा त्याचे कार्य हेच मुळात त्या ठिकाणचे असते. इथएनॉल वा द्रवीभूत पेट्रोलला ठिणगी टाकून प्रज्वलीत केल्यानंतर इंजिनाच्या सिलेंडर हेडवर लावलेला स्पार्क प्लग सतत आपले ठिणगी चेतवण्याचे काम चालू ठेवतो.स्पार्क प्लगमथ्ये विद्युतरोधित केंद्रीय इलेक्ट्रोड असतो. त्याच्या बाहेरच्या बाजूला विद्युत रोधित तारेद्वारा तो जोडलेला अलतो. त्यातून तो इंजिनाच्या आंतिरक दहन क्रियेत महत्त्वाचे काम करीत असतो. सिलेंडरच्या आत तो ठिणगी उत्पन्न करतो.
१८६० मध्ये एटीएन लेनोइर याने अशा स्पार्क प्लगचा पहिल्यांदा प्रयोग केला होता. प्राथिमक स्तरावर पिहले पेटंट निकोला टेस्ला याच्याकडून १८९८ मध्ये तर फ्रेडरपिक रिचर्ड्स सिम्स व रॉबर्ट बॉश यांना मिळाले. मात्र १९०२ मध्ये रॉबर्ट बॉश यांनी केलेल्या संशोधनामुळे व्यावसायिक स्वरूपातील व्यवहार्य अशा उच्च व्होल्टेज स्पार्क प्लगचा अविष्कार केला. अंतर्गत दहन करणाऱ्या इंजिनाच्या विकासाला तेव्हा खऱ्या अर्थाने चालना मिळाली. वाहनातील इंजिनाप्रमाणेच अन्य ठिकाणीही स्पार्क प्लगचा वापर केला जातो. स्पार्क प्लग एक उभट आकाराचा धातूमध्ये तयार केलेली एक वस्तू आहे. त्याच्या एका बाजूला जो भाग इंजिनात असतो तेथे स्पार्क पडला जातो तो इलेक्ट्रॉड असतो.
पोर्सेलिनसारख्या घटकाने हा प्लग वेढलेला असतो. प्रचंड ऊर्चा इंजिनात तयार होताना तो अतिशय उष्ण अशा तापमानात असतो. बाहेरच्या बाजूला तो एका वायरीला संलग्न केलेला असतो, तेथून त्याला करंट मिळतो. प्लग नसेल तर इंजिन व्यर्थ आहे हे नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे त्या प्लगचा इलेक्ट्रॉड विशिष्ट काळानंतर खराब होणे व तो वेळेवर बदलला जाणे हे कारच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. त्याचा इलेक्ट्रॉड हा बाहेर काढून त्यातील गॅप नीट ठेवून तो साफही करून त्यात योग्य अंतर ठेवून तो वापरला जातो. यातील ही गॅप हा ही अतिशय महत्त्वाचा भाग असून ती जर योग्य नसेल तर इंजिन खऱाब पद्धतीने चालेल व कदाचित चालणारही नाही. मात्र ठरावीक वापरानंतर तो बदलणे हे ही अतिशय महत्त्वाचे आहे. कारण स्पार्कविना इंजिनाचे आंतरिक दहन अशक्य आहे व त्याशिवाय इंजिन चालणेही शक्य नाही.