Suzuki ने लॉन्च केल्या दोन ऑफ-रोड बाईक, जाणून घ्या किंमत आणि खासियत!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 03:44 PM2018-10-03T15:44:53+5:302018-10-03T15:47:06+5:30
टू-व्हीलर निर्माता कंपनी सुझुकीने मोटरसायकल इंडिया प्राइव्हेट लिमिटेड (SMIPL) ने बुधवारी आपल्या ग्लोबल फ्लॅगशिप मोटोक्रॉस बाईक्स RM-Z450 आणि RM-Z250 लॉन्च केल्या आहेत.
नवी दिल्ली : टू-व्हीलर निर्माता कंपनी सुझुकीने मोटरसायकल इंडिया प्राइव्हेट लिमिटेड (SMIPL) ने बुधवारी आपल्या ग्लोबल फ्लॅगशिप मोटोक्रॉस बाईक्स RM-Z450 आणि RM-Z250 लॉन्च केल्या आहेत. या बाईक खासकरुन रायडर्स अधिक चांगला ऑफ रोड अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत.
ग्राहकांना RMZ सीरिजची बाईक चॅम्पियन यलो कलरमध्ये मिळेल. तर देशातील काही निवडक डिलर्सकडूनच ही बाईक ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. कंपनीने RM-Z450 आणि RM-Z250 या बाईक्सची क्रमश: 7,10,000 रुपये(एक्स-शोरुम दिल्ली) आणि 8,31,000 रुपये (एक्स-शोरुम, दिल्ली) इतकी किंमत ठेवली आहे.
RM-Z450 च्या 2019 व्हेरिएंटमध्ये 449 cm3, 4-स्ट्रोक, फ्यूल इंजेक्टेड, DOHC इंजिन दिलं गेलं आहे. ही बाईकमध्ये होलशॉट असिस्ट कंट्रोल दिलं आहे. यात रोड कंडीशनच्या हिशोबाने बेस्ट पर्याय निवडण्यासाठी तीन मोड दिले आहेत. कंपनीने माहिती दिली की, RM-Z450 पहिली मोटोक्रॉस बाईक आहे, ज्यात नवीन बॅलन्स फ्री रिअर कुशन टेक्नॉलॉजी दिली गेली आहे. याने रस्त्यावर चांगलं ट्रॅक्शन आणि चांगलं शॉक एब्जॉर्प्शन मिळतं.
याचप्रमाणे सुझुकी 2018 RM-Z250 मध्ये कॉम्पॅक्ट आणि लाइटवेट डिझाइन असलेलं 249cm3, 4-स्ट्रोक, फ्यूल इंजेक्टेड, DOHC इंजिन दिलं गेलं आहे. या बाईकमध्ये फ्यूल इंजेक्शन सिस्टम आणि अॅल्यूमिनियम रिम्स दिले गेले आहेत. जेणेकरुन ही बाईक सुपरक्रॉस, मोटोक्रॉस आणि ऑफ रोड कंडीशनसारख्या रेसिंग इन्वायर्नमेंट उतरु शकेल. कंपनीनुसार, ही बाईक लाईटवेट आणि कॉम्पॅक्ट तयार करण्यात आली आहे.