टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV) ही देशातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही (SUV) आहे. सध्या मार्केटमध्ये EV सेगमेंटमध्ये Nexon EV चा दबदबा आहे. यामागील कारण म्हणजे टाटा मोटर्सने Nexon EV मध्ये दिलेली फीचर्स आहेत.
अलीकडेच, टाटा मोटर्सने Tata Nexon EV वर मोठी सूट दिली आहे, ज्यामध्ये तुम्ही ही एसयूव्ही 2.80 लाख रुपयांपर्यंत स्वस्तात मिळवू शकता. ही ऑफर ऐकून तुम्ही Tata Nexon EV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर टाटा मोटर्सची ही ऑफर Tata Nexon EV आणि फेसलिफ्ट Tata Nexon EV या दोन्हींवर असणार आहे.
टाटा मोटर्सच्या मते, Tata Nexon EV आणि फेसलिफ्ट Tata Nexon EV वर ही सवलत फक्त 2023 मॉडेलवर उपलब्ध आहे. तुम्ही 2024 मॉडेल विकत घेतल्यास, तुम्हाला दोन्ही इलेक्ट्रिक SUV साठी पूर्ण पैसे द्यावे लागतील. तसेच, ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे.
Nexon EV वर सूटTata Nexon EV दोन मॉडेल्समध्ये येते, प्राइम आणि मॅक्स. टाटा मोटर्सकडून Nexon EV च्या प्राइम व्हेरिएंटवर 1.90 लाख ते 2.30 लाख रुपयांची सूट देऊ शकते. तसेच, Nexon EV च्या मॅक्स व्हेरिएंटवर तुम्हाला 2.80 लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
Tata Nexon च्या प्री-फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये 30.2kwh बॅटरी पॅक असेल, ज्यामध्ये 129hp इलेक्ट्रिक मोटर मिळेल. जी एका चार्जमध्ये 312 किमीची रेंज देते. तसेच, कारच्या मॅक्स व्हेरिएंटमध्ये 40.5kwh बॅटरी पॅक आहे, जो 143hp इलेक्ट्रिक मोटरसह येतो आणि 413 किमीची रेंज देतो.
फेसलिफ्ट Tata Nexon EV वर सूटफेसलिफ्ट Nexon EV fearless MR, Empowered+ LR आणि Empowered MR व्हेरिएंटमध्ये येते, ज्यावर 2023 च्या मॉडेलवर 65 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. फेसलिफ्टेड Nexon EV चे MR व्हेरिएंट 30.2kwh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह येते, जे 325 किमीची रेंज देते. तर त्याचे LR व्हेरिएंट 40.5kwh च्या पॅकसह येते, जे 465 किमीची रेंज देते.