नवी दिल्ली : सणासुदीचा काळ लक्षात घेता कार निर्मात्यांनी ग्राहकांना कार खरेदी करण्यासाठी आकर्षित करण्याचे काम सुरु केले आहे. टाटा मोटर्सनेही आपल्या काही कारवर 45,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट जाहीर केला आहे. टाटा मोटर्सने सणासुदीच्या हंगामात टाटा टियागो, टाटा टिगोर, टाटा हॅरियर, टाटा नेक्सॉन यांसारख्या कारवर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट जाहीर केला आहे.
Tata Tiagoटाटा टियागो आपल्या XE, XM, XT मॉडेल्सवर 10,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे. दुसरीकडे, XD आणि त्यावरील 10,000 रुपयांची कॅश डिस्काउंट 10,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणजेच एकूण 23,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5,39,900 रुपये ते 7,46,900 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. त्याचवेळी, टाटा टियागोच्या सीएनजी मॉडेलवर कोणतीही ऑफर नाही.
Tata Tigorकंपनी टाटा टिगोर कारच्या XE, XM मॉडेल्सवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनससह एकूण 13,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. दुसरीकडे, XZ आणि त्यावरील मॉडेल्सवर, कंपनी 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटसह एकूण 23,000 रुपयांचा डिस्टाउंट ऑफर करत आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5,99,900 रुपये ते 8,28,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. कारच्या CNG मॉडेलवर कोणतीही सूट दिली जात नाही.
Tata Harrierकंपनी या कारच्या सर्व व्हेरिएंटवर 40,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंटसह 45,000 रुपयांचा डिस्काउंट ऑफर करत आहे. या कारची सुरुवातीची किंमत 14,69,900 रुपयांपासून सुरू होते आणि 22,04,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते.
Tata Nexonकंपनी टाटा नेक्सॉनच्या डिझेल व्हेरिएंटवर केवळ 15,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह 5,000 रुपयांचा डिस्काउंट बोनससह एकूण 20,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या कारची सुरुवातीची किंमत 7,59,900 रुपये ते 13,94,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.
Tata Safariटाटा मोटर्सच्या या कारच्या सर्व व्हेरिएंट्सवर 40,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काउंट अशी एकूण 45,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. तर, या कारची सुरुवातीची किंमत 15,34,900 रुपये ते 23,55,900 रुपये (दिल्ली एक्स-शोरूम) आहे.