Tata Sierra Electric: टाटा मोठा गेम खेळणार! पहिली कार पुन्हा येतेय; ती देखील इलेक्ट्रीकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 12:51 PM2022-01-08T12:51:23+5:302022-01-08T12:52:35+5:30
Tata Sierra Electric Car: टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन सिग्मा प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. टाटा सिएरा या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.
1945 मध्ये टेल्कोची स्थापना झाली, यानंतर मर्सिडीज बेंझसोबत करार करून 1954 मध्ये पहिले कमर्शिअल व्हेईकल आणि लॉरी लाँच झाली. मात्र, पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये टाटाला येण्यास 37 वर्षांचा काळ जावा लागला. 1991 मध्ये प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी टाटा मोटर्सची पहिली कार भारताच्या रस्त्यांवर आणली. यानंतर जे झाले ते आज जग त्याची दखल घेते. आता हीच पहिली कार पुन्हा भारतीय बाजारात एन्ट्री मारणार आहे, ती देखील इलेक्ट्रीक कार सेगमेंटमध्ये.
टाटाने डिसेंबर महिन्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. आता टाटा इलेक्ट्रीक वाहनांच्या सेगमेंटमध्ये आघाडीवर असून येत्या काळात नवनवीन कार आणणार आहे. परंतू, टाटा याच कारबरोबर एक पहिलीवहिली कार देखील भारतीय बाजारात आणणार आहे. टाटा सिएरा ही टाटाची पहिली कार होती. १९९१ मध्ये लाँच झालेली ही कार टाटा पुन्हा आणणार आहे. नव्या रुपात, इलेक्ट्रीकमध्ये ही कार आणली जाणार आहे. ही पूर्णपणे स्वदेशी कार होती.
नेक्सॉन ईवी (Nexon EV) ने भारतीय बाजारात धुमाकुळ घातला आहे. नेक्सॉनची उपस्थिती आता रस्त्यांवर जाणवू लागली आहे. टाटा सिएरा (Tata Sierra) ला देखील टाटाने Auto Expo 2020 मध्ये कॉन्सेप्ट व्हेईकल म्हणून दाखविले होते. आता हेच डिझाईन टाटा ईव्हीमध्ये आणणार आहे. Tata Motors ची ही पहिली कार असणार आहे जी फक्त इलेक्ट्रीकमध्ये येणार आहे. म्हणजेच टाटाची ही Pure Electric Car असणार आहे.
टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन सिग्मा प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. टाटा सिएरा या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. सध्या कंपनीचे Nexon EV आणि Tigor EV फक्त त्यांच्या पेट्रोल इंजिन प्लॅटफॉर्मवर तयार केले आहेत. नवीन सिएराला नवीन डोअर कॉम्बिनेशन मिळण्याची अपेक्षा आहे, तर जुन्या टाटा सिएराला 3 दरवाजे मिळायचे. मात्र, टाटा सिएरा भारतीय बाजारपेठेत कधी उतरणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण 2025 पर्यंत ते पूर्णपणे बाजारात येण्याची शक्यता आहे.