टाटा मोटर्स ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कार विकणारी कंपनी आहे. यातही टाटा नेक्सॉन ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कर आहे. कंपनी आपला पोर्टफोलिओ सतत्याने वाढवताना दिसत आहे. आता कंपनी लवकरच 4 SUV बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे यांपैकी एका एसयूव्हीमध्ये सीएनजी सुविधा मिळणार आहे. पहा या चारही कारची यादी...
Tata Harrier and Safari Facelift -देशात 2023 Tata Harrier आणि Safari फेसलिफ्टची बुकिंग आधीपासूनच सुरू झाली आहे. या कारमध्ये अॅडव्हॉन्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम (ADAS) सर्वात मोठ्या अपग्रेडच्या स्वरुपात येईल. या दोन्ही एसयूव्हीमध्ये नवे 10.5 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, 7 इंचाचे सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि 360 डिग्री कॅमेराही मिळू शकतो. यांच्या डिझाईनमध्येही काही बदल केला जाऊ शकतो. अपडेटेड हॅरियर आणि सफारी मध्ये 2.0L टर्बो डिझेल इंजिनचा वापर कायम असेल. जे 170bhp आणि 350Nm टार्क जेनरेट करते. ट्रान्समिशन ऑप्शन मध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा समावेश आहे.
New Tata Nexon 2024 -माध्यमांतील वृत्तांनुसार, 2023 Tata Nexon फेसलिफ्ट ऑगस्टपर्यंत बाजारात येईल. यात अधिकांश कॉस्मॅटिक बदल समोरच्या बाजुला केले जातील. एवढेच नाही, तर ही कार ADAS तत्रज्ञानासह सादर करण्यात येईल असेही बोलले जात आहे. कॉम्पॅक्ट टाटा एसयूव्हीमध्ये नव्या हॅरियर आणि सफारीकडून एक नवी टचस्क्रीन इंफोटेनमेंट यूनिट घेण्याचीही शक्यता आहे. यात 1.2L पेट्रोल (125bhp/225Nm) आणि 1.5L डिझेल इंजिन मिळत राहील.
Tata Punch CNG -टाटा पंच सीएनजीला 2023 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. ही कार येणाऱ्या काही महिन्यात लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. या कारमध्ये फॅक्ट्री-फिटेड सीएनजी किटसह 1.2L, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे जवळपास 70bhp - 75bhp पॉवर आणि 100Nm च्या जवळपास टॉर्क देईल. ही कार केवळ मॅन्युअल गिअरबॉक्ससह सादर केली जाईल. पंच सीएनजीमध्ये नवे डुअल सिलिंडर लेआऊट आहे. जे एक चांगले बूट स्पेस ऑफर करते.