टाटाची हॅरिअर आली...किंमत 12.69 लाखांपासून सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 04:51 PM2019-01-23T16:51:02+5:302019-01-23T16:51:40+5:30
टाटाने नेक्सॉनप्रमाणे या कारमध्येही सुरक्षिततेची काळजी घेतलेली आहे.
मुंबई : टाटा कंपनीने बहुप्रतिक्षित हॅरिअर ही एसयुव्ही श्रेणीतील कार आज लाँच केली. हॅरिअर ही कार चार मॉडेलमध्ये येणार असून सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 12.69 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
टाटाने नेक्सॉनप्रमाणे या कारमध्येही सुरक्षिततेची काळजी घेतलेली आहे. यासाठी सहा एअरबॅग दिल्या आहेत. शिवाय ही कार जग्वारच्या डी-8 प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. या एसयुव्हीमध्ये फियाटचे क्रायोटेक 2.0 लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 140 PS ताकद निर्माण करते.
याशिवाय सुरक्षेसाठी इएसपी, एबीएस, इबीडी, इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोल, स्टॅबिलीटी कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, हायड्रॉलिक ब्रेक असिस्ट यासारख्या महत्वाच्या प्रणाली देण्यात आल्या आहेत.
शिवाय भविष्यातील तंत्रज्ञानाला साजेशी 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिमही देण्यात आली आहे. इंधन टाकीची क्षमता 50 लीटरची आहे.
A game changer that reflects the aspirations of our customers. Harrier - the SUV that’s #AboveAll has been priced at Rs. 12.69 lakhs (ex-showroom, Delhi), as announced by Guenter Butschek – CEO & MD. Book a test drive today! https://t.co/9usO5F0sx1pic.twitter.com/Bve9xzYAVh
— Tata Motors (@TataMotors) January 23, 2019
व्हेरिअंट आणि किंमत
- Harrier XE- 12.69 लाख रुपए (ex-showroom, Mumbai)
- Harrier XM- 13.75 लाख रुपए (ex-showroom, Mumbai)
- Harrier XT- 14.95 लाख रुपए (ex-showroom, Mumbai)
- Harrier XZ- 16.25 लाख रुपए (ex-showroom, Mumbai)