Electric Vehicles Tesla Cybertruck सध्या जगभरात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी मोठ्या प्रणामात वाढत आहे. या सेगमेंटमध्ये अमेरिकेतील कंपनी Tesla ही आघाडीवर आहे. नुकतंच कंपनीनं जागतिक बाजारपेठेत आपला पहिला इलेक्ट्रीक Cybertruck लाँच केला होता. या इलेक्ट्रीक पिकअप ट्रकला वर्षाच्या अखेरीस अमेरिकेतील बाजारपेठेत लाँच केलं जाईल. परंतु लाँचपूर्वीच याच्या १० लाख युनिट्सचं बुकींग झाल्याची माहिती समोर आली आहे. याच्या ड्रायव्हिंग रेंजबाबत मोठा खुलासा झाला असून ती हैराण करणारी आहे.
Tesla Cybertruck या वर्षीच्या बहुप्रतीक्षीत मॉडेल्सपैकी एक आहे. मीडिया रिपोर्टनुसार या वाहनाची डिलिव्हरी पुढील वर्षापासून सुरू केली जाऊ शकते. नुकतंच पिक अप ट्रकशी निगडीत एक डॉक्युमेंट लिक झालं आहे. दरम्यान, हे पेटंट अॅप्लिकेशन आहे, ज्यानुसार हे वाहन सिंगल चार्जमध्ये ९८२ किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेज देत असल्याचं सांगण्यात येत आहे.
यापूर्वी कंपनीनं Tesla Cybertruck हे वाहन सादर केलं होतं, तेव्हा कंपनीनं याची बॅटरी पूर्ण चार्ज झाल्याच ८०४ किलोमीटरची रेंज देत असल्याचं म्हटलं होतं. टेस्लानं नव्या Cybertruck साठी नवं सॉफ्टवेअर "कॉन्टेक्स्ट सेंसिटिव यूजर इंटरफेस फॉर एन्हांस्ड व्हिकल ऑपरेशन"चं पेटंट केल्याचं लिक झालेल्या डॉक्युमेंट्समधून समोर आलं आहे.
फोटो व्हायरलया इलेक्ट्रीक ट्रकचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पिकअप ट्रक ९ हजार किलोपेक्षा अधिक वजनाच्या ट्रेलरसह टोईंग मोडमध्ये दाखवण्यात आला आहे. कंपनीद्वारे सांगण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा ते अधिक आहे. या फोटोवरून Cybertruck काही संभाव्य अॅक्सेसरिजसह येऊ शकत असल्याचंही म्हटलं जात आहे.