'ही' इलेक्ट्रिक बाईक 19 हजार रुपयांनी महागली, आता खर्च करावे लागतील 'इतके' पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 09:05 AM2023-06-08T09:05:44+5:302023-06-08T09:06:17+5:30
Tork Kratos R : काही दिवसांपूर्वी कंपनीने Tork Kratos R ची किंमत 2 लाख 28 हजार रुपयांवरून 2 लाख 10 हजार रुपये केली होती.
नवी दिल्ली : 1 जूनपासून सरकारने इलेक्ट्रिक टू व्हीलरवरील FAME II सब्सिडीत कपात केली आहे. यामुळे इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किंमती वाढू लागल्या आहेत. आता पुण्यातील टॉर्क मोटर्सने (Tork Motors) क्रॅटोस आर (Kratos R) इलेक्ट्रिक बाईकच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे आता ही बाईक पूर्वीच्या तुलनेत 19,000 रुपयांनी महाग झाली आहे.
किंमतीत 19 हजार रुपयांच्यावाढीनंतर आता तुम्ही टॉर्क मोटर्सची ही बाईक 1 लाख 87 हजार रुपयांना (एक्स-शोरूम) खरेदी करू शकता. FAME II मधील दुरुस्तीनंतर, आता इलेक्ट्रिक टू व्हीलरवर 10,000 रुपये प्रति kWh दराने सब्सिडी दिली जाईल, तर पूर्वी ग्राहकांना 15,000 रुपये प्रति kWh दराने सब्सिडीचा लाभ मिळत होता.
याशिवाय, याआधी एक्स फॅक्टरी किमतीवर 40 टक्के इन्सेन्टिव मिळत होते. आता ते केवळ 15 टक्के करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की याआधी Kratos R बाईकवर 60 हजारांचे इन्सेन्टिव मिळत होते. पण आता ही रक्कम केवळ 22,500 रुपये करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कंपनीने Tork Kratos R ची किंमत 2 लाख 28 हजार रुपयांवरून 2 लाख 10 हजार रुपये केली होती.
Tork Kratos R च्या टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाल्यास ही बाईक ताशी 105 किमी वेगाने धावू शकते. बाईक 4 kWh लिथियम आयन बॅटरीद्वारे देण्यात आली आहे, जी एका चार्जवर 120 किमी (इको मोड) ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते, असा दावा केला जातो. याचबरोबर, सिटी मोडवर 100 किमी आणि स्पोर्ट्स मोडवर 70 किमीची रेंज मिळते. ही बाईक फास्ट चार्ज सपोर्टसह येते, त्यामुळे ही मोटरसायकल केवळ एका तासात 80 टक्के चार्ज होते. ही केवळ 3.5 सेकंदात 0 ते 40 पर्यंत वेग वाढवते.